पाकिस्तान सीमेजवळ संशयास्पद कबुतर
06:25 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ श्रीनगर
Advertisement
जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तान सीमेजवळ एक संशयास्पद कबुतर पकडण्यात आले आहे. नियंत्रण रेषेजवळील एका गावात हे कबुतर आढळल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. खाराह गावात शनिवारी सकाळी 13 वर्षीय आर्यनने हलक्या राखाडी रंगाचे हे कबुतर पकडले. कबुतराच्या दोन्ही पंखावर काळे पट्टे होते. दोन्ही पायांना लाल आणि पिवळ्या रंगाची रिंग जोडलेली असून त्याच्यावर ‘रेहमत सरकार’, ‘रिजवान 2025’ अशा शब्दांसह काही आकडे लिहिलेले आढळले. कबुतराच्या पंखांवर शिक्का मारण्यात आल्यामुळे संशय आणखी बळावला. पुढील तपासासाठी कबुतराला पालनवाला पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कबुतर कुठून आले आणि त्यामागे काही कट आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.
Advertisement
Advertisement