महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशात मिळाला ‘एमपॉक्स’चा संशयित रुग्ण

06:38 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रुग्णालयात आयसोलेट करण्यात आला रुग्ण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशात पहिला एमपॉक्सचा (मंकीपॉक्स) संशयित रुग्ण आढळून आला आहे. रुग्ण एक युवक असून त्याने अलिकडेच एमपॉक्सला सामोरे जाणाऱ्या देशाचा प्रवास केला आहे. या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्सला महामारी घोषित केले असून अनेक देशांमध्ये मोठ्या संख्येत याचे रुग्ण आढळून आले आहेत. भारत सरकार देखील एमपॉक्सवरून अनेक दिवसांपासून सतर्क आहे.

एमपॉक्सच्या संशयित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. युवकाला एमपॉक्सची लागण झाली आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी त्याचा नमुना मिळविण्यात आला असून त्याची तपासणी केली जात आहे. सद्यस्थितीत कुठल्याही अनावश्यक चिंतेची बाब नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

संबंधित संशति रुग्णाप्रकरणी प्रोटोकॉलनुसार खबरदारी घेतली जात आहे. तसेच संभाव्य स्रोताची ओळख पटवत देशाच्या आत प्रभावाचे आकलन करण्यासाठी त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जारी ओ. हे प्रकरण एनसीडीसीकडून करण्यात आलेल्या रिस्क असेसमेंटच्या अनुरूप असून कुठल्याही प्रकारच्या अनावश्यक चिंतेचे कारण नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

प्रभावी उपाययोजना

अशाप्रकारच्या प्रकरणाला हाताळण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे आणि कुठल्याही संभाव्य जोखिमीचे व्यवस्थापन करणे आणि कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 1 जानेवारी 2022 ते 30 जून 2024 पर्यंत जगभरात एमपॉक्सचे एकूण 99,176 लेबोरटरी-कंफर्म रुग्ण आढळून आले. दक्षिणपूर्व आशिया क्षेत्रात 5 सदस्य देशांपैकी थायलंडमध्ये 805 रुग्ण होते, यातील 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर इंडोनेशियात 88, भारतात 27 रुग्ण आढळून आले होते. श्रीलंका आणि नेपाळमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article