For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात लवकरच होणार दिव्यांगजनांचे सर्वेक्षण

12:00 PM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात लवकरच होणार दिव्यांगजनांचे सर्वेक्षण
Advertisement

सर्व दिव्यांगांचा शोध घेऊन मिळविणार माहिती : दिव्यांगाना योजनांचा लाभ देण्यासाठी होणार मदत

Advertisement

पणजी : राज्यातील दिव्यांग बांधवांना सन्मान व आधार देण्याचे काम समाज कल्याण खात्यातर्फे करण्यात येते. परंतु तरीही एकही दिव्यांग बांधव आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी येत्या एक दोन दिवसांत राज्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्व्हेचे कामाला सुरु होईल, अशी माहिती समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी दिली. पंचवाडकर यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांच्या एकूण संख्येविषयी माहिती गोळा करण्याचे काम समाज कल्याण खात्याच्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. हे अधिकारी किंवा कर्मचारी दिव्यांग बांधवांचा शोध घेऊन त्यांच्या घरी सर्व जाऊन माहिती जमवून नोंदी करणार आहेत. सर्व योजना व फायदे या दिव्यांगांना मिळावेत, हा या नोंदणीमागील उद्देश आहे. प्रत्येक गावात किती दिव्यांग आहेत. त्यांना किती प्रमाणात दिव्यांगत्व प्राप्त झाले आहे, त्यांचे वय, शिक्षण व त्यांच्यामध्ये असलेली कौशल्ये या सर्व माहितीची  नोंदणी एकत्रितरित्या ठेवली जाणार आहे. जेणेकरून नोकरी किंवा इतर स्वयंव्यवसाय प्राप्तीसाठी त्यांना कोणतीही आडकाठी किंवा अडचण येऊ नये, यासाठी खात्याने सर्व्हेचा निर्णय घेतला आहे. समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी दिव्यांगांच्या एकत्रित माहिती तयार करण्याच्या कामाला सुरवात करण्यात येईल, असे सांगितले होते. पुढील काही दिवस खात्याचे अधिकारी तसेच कर्मचारी राज्यातील प्रत्येक ग्रामीण व शहरी भागात जाऊन ही नोंदणी करणार आहेत. त्यासाठी खात्याने विविध प्रकारचे 70 मापदंड तयार केलेले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.