दोन दिवसांच्या घसरणीनंतर तेजीची झुळूक
सेन्सेक्स 320 अंकांनी मजबूत : इंडइसंड बँक तेजीत
वृत्तसंस्था/मुंबई
चालू सप्ताहातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात मागील दोन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम मिळाला आहे. यामध्ये गुरुवारच्या सत्रात तेजीची झुळूक नोंदवत सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक बंद झाले आहेत. बीएसई सेन्सेक्स गुरुवारी 81,591 वर उघडला होता. मात्र तो दिवसअखेर 320.70 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 81,633.02 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 81.15 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 24,833.60 वर बंद झाला आहे.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक देखील वाढीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.48 टक्क्यांनी वाढून बंद झाला आणि स्मॉलकॅप निर्देशांक देखील 0.39 टक्क्यांनी वधारला होता. दरम्यान, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मागील सत्रातील सुमारे 444 लाख कोटी रुपयांवरून 446 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात 2 लाख कोटी रुपयांचा नफा झाल्याची नोंद करण्यात आली.
निफ्टीमध्ये कंपन्यांमध्ये, इंडसइंड बँक सर्वाधिक तेजीत राहिला असून याने 2.36 टक्के वाढ केली. यानंतर सन फार्मामध्ये 2.01 टक्के वाढ, अदानी पोर्ट्समध्ये 1.96 टक्के वाढ, इटरनलमध्ये 1.87 टक्के वाढ आणि ट्रेंटमध्ये 1.77 टक्के वाढीची नोंद झाली. दुसऱ्या बाजूला अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी लाइफ 1.09 टक्के नुकसानीत होता. यानंतर टाटा कंझ्युमरमध्ये 1.04 टक्के, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 0.94 टक्के, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 0.87 टक्के आणि बजाज फायनान्समध्ये 0.69 टक्के घसरण झाली.
‘या’ क्षेत्रांमधील कामगिरी
विविध क्षेत्रांमधील निर्देशांकांमध्ये, धातू समभागांनी मात्र तेजी सुरू ठेवली, निफ्टी धातू निर्देशांक 1.21 टक्क्यांनी वाढला. यामुळे तो अव्वल कामगिरी करणारा ठरला होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक 824
- सन फार्मा 1699
- अदानी पोर्ट 1438
- इटर्नल 228
- ट्रेंट 5657
- टेक महिंद्रा 1600
- टाटा स्टील 163
- विप्रो 250
- अदानी एंटरप्रायझेस 2540
- आयशर मोटर्स 5379
- एसबीआय लाईफ 1825
- टाटा मोटर्स 724
- इन्फोसिस 1585
- पॉवरग्रीड कॉर्प 293
- नेस्ले 2435
- अॅक्सिस बँक 1201
- सिप्ला 1476
- जेएसडब्ल्यू स्टील 1006
- मारुती सुझुकी 12392
- डॉ. रे•ाrज लॅब्ज 1248
- एचसीएल टेक 1664
- भारती एअरटेल 1863
- टायटन 3588
- महिंद्रा आणि महिंद्रा 3009
- रिलायन्स 1417
- कोटक महिंद्रा 2081
- बजाज ऑटो 8874
- अल्ट्राटेक सिमेंट 11269
- लार्सन टूब्रो 3655
- एचडीएफसी बँक 1927
- एचयूएल 2366
- आयसीआयसीआय 1456
- ओनजीसी 243
- एसबीआय 797
- हिंडाल्को 650
- टीसीएस 3498
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एचडीएफसी लाईफ 780
- टाटा कंझ्युमर्स 1109
- भारत इले. 386
- जिओ फायनॅन्शियल 287
- बजाज फायनान्स 9204