For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅम्प येथील शाळेत विद्यार्थ्याला मारहाण

10:29 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्प येथील शाळेत विद्यार्थ्याला मारहाण
Advertisement

शिक्षण विभागाकडून चौकशी : शिक्षिकेवर कारवाईची मागणी

Advertisement

बेळगाव : विद्यार्थ्यांना मारहाण करणे कायद्याने गुन्हा असतानाही कॅम्प येथील एका इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना एकदा नव्हे तर दोनवेळा मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. डिसेंबर 2023 मध्ये मारहाणीची ही घटना घडल्यानंतर पालकाने शाळेसह गटशिक्षणाधिकारी, जिल्हाशिक्षणाधिकारी, तसेच शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करूनही अद्याप संबंधित शिक्षिकेवर तसेच शाळेवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दिलेला गृहपाठ वेळेत पूर्ण न केल्याचे कारण देत तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना डिसेंबर 2023 मध्ये घडली होती. विद्यार्थ्यांनी घरी जाऊन यासंदर्भात पालकांना माहिती दिली. परंतु, गृहपाठ केला नसल्याने शिक्षिकेने मारल्याबद्दल पालकांनी दुर्लक्ष केले. तिसऱ्या दिवशी पुन्हा शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केल्याने विद्यार्थ्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्यावेळी तो शाळेस जाण्यासही तयार होत नव्हता.

मुख्याध्यापकाकडून उडवाउडवीची उत्तरे

Advertisement

पालकांनी याबाबत माहिती घेतल्यानंतर शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पालकांनी दुसऱ्याच दिवशी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारला. मुख्याध्यापकांनी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत पालकांना हाकलून लावले. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता शाळेचे नाव खराब होईल, यासाठी इतर पालकांनी तक्रार दाखल करू नका, असा सल्ला दिला. अखेर संबंधित पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संबंधित शिक्षक व शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून एका अधिकाऱ्याची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपला अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला. परंतु, दोन महिने उलटले तरी अद्याप संबंधित शिक्षिकेवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्याचा मानसिक छळ

शालेय विद्यार्थ्यांना मारहाण करणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. तरीदेखील शिक्षिकेकडून दोनवेळा मारहाण झाली. तसेच संबंधित विद्यार्थ्यासोबत इतर विद्यार्थ्यांना बोलू दिले जात नाही. तसेच या ना त्या प्रकारे मानसिक छळ करण्याचा प्रयत्न संबंधित शिक्षिका व शाळेकडून केला जात असल्याने कारवाईची मागणी पालकवर्गातून होत आहे.

Advertisement
Tags :

.