For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2025 मध्ये एकापेक्षा एक कार्सची दमदार एंट्री?

06:16 AM Jan 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
2025 मध्ये एकापेक्षा एक कार्सची दमदार एंट्री
Advertisement

मारुती, टाटा मोटर्स, किआ या कंपन्यांच्या नव्या गाड्या बाजारात येणार

Advertisement

नवी दिल्ली :

वर्ष 2025 मध्ये भारतीय ऑटोमोबाइल इंडस्ट्री नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या  उत्साहासोबत करणार आहे. यामध्ये काही कंपन्या अनेक नवीन कार लॉन्चिंग करण्याच्या तयारीत आहेत. यातून बाजाराला नवीन ऊर्जा मिळण्याचे संकेत आहेत.  देशामध्ये 17 ते 22 जानेवारी दरम्यान भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 ची दुसरी आवृत्ती आयोजित होणार आहे, हे प्रदर्शन भारतातले सर्वात मोठे प्रदर्शन ठरणार आहे. या मेगा इव्हेंटमध्ये 34 अधिक कार निर्माते, 800 ओरिजिनल कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि 1,00 ब्रँड्स सहभाग घेणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

चालू वर्षात टाटा मोटर्स, मारुती, किया, ऑडी, एमजी आणि होंडा या कंपन्या ग्राहकांसाठी सॉलिड फीचर्स आणि एडवांस्ड सेफ्टीसोबत अनेक नवीन मॉडेल सादर करणार आहेत. यावर एक नजर टाकूया. यामील काही चर्चित मॉडेल...

टाटा सिएरा ईव्ही आणि आयसीई:

टाटा मोटर्स, भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये आपली सिएरा एसयूवी (टाटा सिएरा एसयूव्ही) हे नियमीत इंजिन आणि इलेक्ट्रिक वर्जन दोन्हींमध्ये आणणार आहे. ती पहिल्यांदा 2020 ऑटो एक्सपोमध्ये एक कॉन्सेप्ट म्हणून सादर केली गेली आणि शक्यतो 17 जानेवारी, 2025 ला लॉन्च केली जाऊ शकते. सिएरा ईवीची संभाव्य किंमत 20 लाख रुपये आणि सिएरा आईसीईची संभाव्य किंमत 11 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.

किया सिरोस

दक्षिण कोरिया वाहन कंपनी किया मोटर्स भारतामध्ये आपली दुसरी सब-4 मीटर एसयूवी सिरॉस दाखल करणार आहे. एक बी सेगमेंटमधील ही एसयूव्ही असणार आहे. ग्राहकांना नव्या वाहनाची डिलीवरी फेब्रुवारी 2025 पासून सुरू करणार असल्याचे समजते. ही एसयूव्ही ऑटो एक्सपो 2025 मध्ये लॉन्च केली जाणार आहे.

सुझुकी ई विटारा:

देशातील सर्वोत्कृष्ट कार निर्मिती कंपनी मारुतीने विटारा एसयूवी (ई विटारा एसयूव्ही) पहिला टीझर सादर केला आहे. कंपनी आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक कार भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये सादर करणार आहे. ज्याची अंदाजित किंमत जवळपास 22 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.

2025 होंडा सिटी : ब्राजीलनंतर आता भारतात होणार सादर

ब्राजीलमध्ये होंडाने 2025 सिटी फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. डिझाईनमध्ये बदल करण्यासोबत इतर वैशिष्ठ्यो कंपनीने दिली आहेत.

एमजी सायबरस्टर:

एमजी आपली ईवी लाइनअप विस्तारित करण्यासाठी भारतामध्ये सायबरस्टर लॉन्च करण्यासाठी तयार आहे. जागतिक बाजारात 77 केडब्लूएच बॅटरी पॅक आणि 510 पीएस ड्यूल इलेक्ट्रिक मोटर्सच्या सोबत ही गाडी सादर करण्यात आली आहे.

ऑडी आर 6 ई-ट्रॉन:

ऑडी आपली आर 6 ई-ट्रॉन एसयूव्ही भारतामध्ये लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. जागतिक पातळीवर तीन वेरिंट्स सादर केले गेले आहेत. सर्वांमध्ये 94.9 केडब्लूएच बॅटरी पॅक दिला गेलाय. या गाडीची किंमत 1 करोड रुपये राहणार असल्याचा अंदाज आहे.

Advertisement
Tags :

.