Kurundwad news | कुरुंदवाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर;बालिकासह वृद्धावर हल्ला; नागरिक दहशतीखाली
. कुरुंदवाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार!
कुरुंदवाड- कुरुंदवाड येथील गोठणपूर व गिरीश सिनेमा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत नागरिक, बालिका व जनावरांवर हल्ला करुन जखमी केले आहे, आनंदा किसप्पा - प्रधाने (वय ६०), हेमा यादव (वय ९) अशी जखमींची नावे आहेत. जनावरांच्या वरही औषधोपचार करण्यात आले आहेत, कुत्र्याच्या या हल्ल्याने शहरात भीती निर्माण झाली आहे.
गोठणपूर येथे प्रधाने हे घरासमोरील - गोठ्यात झोपलेले असताना कुत्र्याने त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला.शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. याच कुत्र्याने परिसरातील चार रेडके व तीन शेळीच्या पिल्लांनाही जखमी केले. शहरातील गिरीष सिनेमा परिसर, माळभाग व शाहू चौक भागातही या कुत्र्याने हल्ले चढवले.
हेमा यादव या लहान बालिकेच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली असून सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन महिन्यात हा तिसरा हल्ला असून पालिका
टेंडर की बनाव ?
मोकाट कुत्रे पकडण्यासाठी टेंडर काढल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष कारवाई दिसत नसल्याने 'हे टेंडर खरे की केवळ कागदोपत्री बनाव?' असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत,
प्रशासनाच्या कुत्री पकडण्याची मोहीम कधी सुरू होणार याबाबत नागरिकांतून उलटसुलट चर्चा रंगली आहे.