For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाठलाग करीत भटक्या कुत्र्याने घेतला महिलेच्या पायाचा चावा

08:34 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाठलाग करीत भटक्या कुत्र्याने घेतला महिलेच्या पायाचा चावा
Advertisement

टिळकवाडी काँग्रेस विहिरीजवळील घटना :  रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण  

Advertisement

 त.भा.प्रतिनिधी

बेळगाव : दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करून भटक्या कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास टिळकवाडी येथील काँग्रेस विहिरीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या सहा महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे महापालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement

काँग्रेस विहिरीनजीक राहणारी एक महिला गेल्या काही वर्षांपासून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत आहे. त्यामुळे परिसरात 20 ते 30 भटकी कुत्री ठाण मांडून आहेत. भटक्या कुत्र्यांना अन्न देऊ नका, असे तेथील रहिवाशांकडून त्या महिलेला वारंवार सांगितले जात असले तरीदेखील तिने कुत्र्यांना अन्न देणे सुरूच ठेवले आहे. सदर कुत्र्यांच्या कळपाकडून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी कुत्र्यांनी दोघांचा चावा घेतला होता.

सोमवारी सायंकाळी एक महिला काँग्रेस विहिरीनजीकच्या ज्योतिर्लिंग अपार्टमेंटजवळून मोटारसायकलवरून जात होती. दुचाकीचा कुत्र्याने पाठलाग करून महिलेच्या पायाचा चावा घेतला. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या त्या महिलेला महानगरपालिकेकडून समज देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Advertisement
Tags :

.