महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अचानक येणाऱ्या पुरापासून वाचविणारी अजब व्यवस्था

06:37 AM Oct 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टोकियोत अंडरग्राउंड कॅथेड्रल

Advertisement

जपान तंत्रज्ञानाप्रकरणी अन्य देशांपेक्षा खूपच आघाडीवर आहे. अलिकडेच शन्शान चक्रीवादळामुळे टोकियोत अतिवृष्टी झाली. यामुळे तेथे वाहणाऱ्या दोन नद्यांना पूर आला, परंतु टोकियात जमिनीखाली निर्मित मंदिराने शहराला पूरापासून वाचविले आहे. या टेम्पलला कॅथेड्रल आणि श्राइन देखील म्हटले जाते.

Advertisement

या कॅथेड्रलमध्ये 59 विशालआकारचे स्तंभ आहेत. प्रत्येक स्तंभाचे वजन 500 टन आहे. तर उंची 59 फूट आहे. जेव्हा नजीकच्या नदीत पूर येतो, तेव्हा ओव्हरफ्लो होत असलेले पाणी या 6.3 किलोमीटर लांब कॅथेड्रलमध्ये येते, यात पाणी जमा होते, ज्यानंतर हवामान सुरळीत झाल्यावर बाहेर काढले जाते.

तापमान वाढताच वातावरणातील वाफेचे प्रमाण वाढते, यामुळे अधिक पाऊस पडतो. अशा स्थितीत कॅथेड्रलमधील भुयार शहराला पूरापासून वाचवितात असे टोकियो विद्यापीठातील प्राध्यापिका सीता इमोरी यांनी सांगितले आहे. सीता इमोरी यांना 2007 मध्ये हवामान शास्त्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता.

 

कॅथेड्रलचे अधिकृत नाव मेट्रोपॉलिटन आउटर एरिया अंडरग्राउंड डिस्चार्ज चॅनेल आहे. जेव्हा देखील टोकियोवर सागरी पूर किंवा पावसामुळे अचानक येणाऱ्या पुराचा धोका निर्माण होतो, तेव्हा कॅथेड्रल सिस्टीम सक्रीय केले जाते असे इमोरी यांनी सांगितले आहे.

भविष्यात काय घडणार हे कुणालाच माहित नसते. तापमान ज्याप्रकारे वाढत आहे, ते पाहता त्याचा फटका आम्हा सर्वांनाच बसणार आहे. अशा स्थितीत अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज पूर्ण जगाला आहे. याद्वारे शहरी पूरापासून लोकांना वाचविता येणार असल्याचे इमोरी यांनी म्हटले आहे.

 

कॅथेड्रल कॉम्प्लेक्स तयार करण्यास 13 वर्षे लागली आहेत. याकरता सुमारे 13,687 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 2006 मध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाली. तेव्हापासून या यंत्रणेने स्वत:च्या खर्चाच जवळपास दुप्पट मूल्याचे नुकसान टाळले आहे. या यंत्रणेमुळे अनेकदा पूरापासून पिकांचे नुकसान टळले आहे. शहर, स्टोअर आणि गोदाम पाण्याखाली जाण्यापासून वाचले आहे. इंजिनियरिंगची कमाल असण्यासोबतच हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ देखील आहे. येथे चित्रपटांचे चित्रिकरण देखील केले जाते. कॅथेड्रलमध्ये 100 ऑलिम्पिक स्वीमिंग पूल इतके पाणी साठविले जाऊ शकते.

कॅथेड्रल सहा मजली जमिनीत आहे. याचे एक स्वत:चे मायक्रोक्लायमेट आहे. जे हिवाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहते. अनेकदा याच्या स्तंभाच्या वरील हिस्स्यातून ढगापर्यंत पाहता येते. याच्या आत सूर्यप्रकाशाची आधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर लाइट्स लावण्यात आल्या आहेत. पूर्ण टनेल सिस्टीम कॅमेऱ्याच्या देखरेखीत असते. याचे सर्व गेट मास्टर कंट्रोल सेंटरमधून ऑपरेट होतात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article