For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक विचित्र घर

06:12 AM Apr 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
एक विचित्र घर
Advertisement

आपल्या अवती-भोवती नेहमीच आपण अनेक चित्रविचित्र स्थाने, वस्तू किंवा इमारती पाहत असतो, ही वस्तुस्थिती आहे. अलिकडच्या काळात प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन असल्याने अशा बाबींचे त्वरित व्हिडीओ चित्रण केले जाते. ते लगेचच प्रसरीतही केले जाते. त्यामुळे त्यांची त्वरित प्रसिद्धीही होते. सध्या असाच एका विचित्र घराचा व्हिडीओ प्रसारित होत असून त्याला असंख्य लाईक्स आले आहेत.

Advertisement

हा एका राहत्या घराचा व्हिडीओ आहे. हे घर पाहिल्यानंतर त्याला ‘राहते घर’ का म्हणतात, असा प्रश्न आपल्याला पडल्याखेरीज राहणार नाही. कारण हे घर एखाद्या पडलेल्या इमारतीसारखे किंवा निर्माणाधीन वास्तूसारखे दिसते. या घराला आत-बाहेर करण्यासाठी पायऱ्याच नाहीत. पायऱ्यांऐवजी केवळ एक रॉडची शिडी आहे. पाण्याच्या टाकीवर चढण्यासाठी ज्या प्रकारची शिडी असते. तशी ही दिसते. ज्या शिडीवरुन जा-ये करताना धडधाकट माणसालाही त्रास होऊ शकतो, तिथे लहान मुले आणि वृद्धांचा तर प्रश्नच नाही. तरीही हे ‘राहते घर’ असल्याची माहिती या व्हिडीओत आहे. या घराची आतील बाजूही अर्धवट पूर्ण केल्यासारखी दिसून येते. या घरात किती माणसे राहतात, याची माहिती या व्हिडीओत नाही. तसेच ते कोणाचे आहे, याचेही अनुमान काढता येत नाही. तथापि, हे घर अस्तित्वात आहे, अशी शाश्वती दिली जात आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून आपल्या टिप्पणी केल्या आहेत. अशा पायऱ्यांऐवजी घरमालकाने लिफ्ट बसविली असती, तर अधिक चांगले झाले असते, अशी टिप्पणी एका दर्शकाने केली आहे. हे घर अशा स्थितीत का आहे याचे उत्तर मिळत नाही. त्याचे बांधकाम पूर्ण व्हायचे आहे, की हेतुपुरस्सर प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा खर्च वाचविण्यासाठी ते अशाच अवस्थेत ठेवण्यात आहे, यासंबंधीही काही माहिती मिळू शकत नाही. तरीही ते इन्स्टाग्रामवर चांगलेच लोकप्रिय झाले आहे, हे दर्शकांची संख्या सांगते.

Advertisement
Advertisement
Tags :

.