सुंदर चेहरे पाहता न येण्याचा अजब आजार
सुंदरता ही पाहणाऱ्या डोळ्यांमध्ये असते असे बोलले जाते. जर एखादी गोष्ट आपल्याला चांगली वाटली तर आमच्या नजरेत त्याहून सुंदर काहीच असू शकत नाही. तसेच एखादी गोष्ट वाईट वाटली तर त्यात कितीही वैशिष्ट्यो असली तरीही ती आपल्यासाठी सुंदर ठरू शकत नाही. परंतु एक इसम असा आहे, ज्याच्या डोळ्यांमध्ये सुंदरता सामावतच नाही. त्याने कितीही सुंदर माणूस पाहिला तरीही तो त्याला वेडावाकडाच दिसतो.
अमेरिकेच्या टेनेसी येथे राहणाऱ्या या इसमाला अजब आजार आहे. त्याच्यासमोर सुंदरातील सुंदर महिला किंवा पुरुष बसवा, तो त्यांच्यातील त्रुटीच पाहू शकतो. त्याचे डोळे कुठलाही सुंदर चेहरा पाहूच शकत नाहीत. 59 वर्षीय विक्टर शैराहला 2020 पासून ही समस्या सुरू झाली असून आता तो सुंदर चेहरे पाहू शकत नाही.
जर तुम्ही एखाद्याला भेटलात आणि त्याचा चेहरा बिघडलेला दिसून आला तर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करून पहा. विक्टर शैराह यांना नोव्हेंबर 2020 मध्ये एकेदिवशी सकाळी उठल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार, रचना आणि रंग अजब दिसून येत असल्याचे जाणवले. कधीकाळी चांगली नजर असलेल्या विक्टर यांना स्वत:च्या रुममेटपासून प्रत्येकाचा चेहरा वेडावाकडा दिसून येत होता. हा प्रकार अत्यंत भीतीदायक होता असे ते सांगतात. काही काळानंतर त्यांना हा दृष्टीदोष नसून मानसिक सिंड्रोम असल्याचे कळले, ज्याला प्रोसोपोमेटामॉर्फोप्सियाकहा म्हटले जाते.
पीएओ हा अल्टा-रेयर डिसऑर्डर आहे. ज्याचे जगात केवळ 75 रुग्ण आहेत. डॉक्टरांना देखील याविषयी फारशी माहिती नाही. विक्टर यांना चेहरा वेडेवाकडे दिसून येतात, परंतु ते लोकांची ओळख विसरत नाहीत. न्यू हॅम्पशायरच्या डार्टमाउथ कॉलेजचे वैज्ञानिक आता शैराह यांच्या या स्थितीवर संशोधन करत आहेत. मागील 4 वर्षांपासून ते अशाचप्रकारे चेहरे पाहतात आणि ओळखतात. या सिंड्रोममागील कारण कुणालाच माहिती नाही, परंतु डोक्याला ईजा झाल्याने विक्टर यांच्यासोबत असे घडले असावे असे डॉक्टरांचे मानणे आहे.