For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपा कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

05:46 PM Mar 01, 2025 IST | Radhika Patil
मनपा कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड
Advertisement

मिरज : 

Advertisement

मुजावर गल्ली, दर्गा परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करत पाणी पुरवठा विभागात घुसलेल्या नशेखोर तक्रारदाराने कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून जबर मारहाण केल्याची घटना गुरूवारी रात्री 11 वाजता घडली. या हल्ल्यात पाणीपुरवठा विभागाचे पाईप इन्स्पेक्टर स्वप्निल आवळे जखमी झाले. याबाबत त्यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली असून, संशयीत हल्लेखोर अजित पाथऊट याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या हल्ल्याच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढला. जोरदार निदर्शने कऊन कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत संशयित हल्लेखोरावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

Advertisement

मुजावर गल्ली येथे दर्गा परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार होती. गुरूवारी रात्री पाईप इन्स्पेक्टर स्वप्निल आवळे व संबंधीत विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तक्रारदारांच्या परिसरात जावून पाहणीही केली होती. त्यानंतर सदर ठिकाणी उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी वॉलमनला सुचनाही केल्या होता. तक्रारदारांचे निरसन कऊन संबंधीत अधिकारी परतले होते.

त्यानंतर स्वप्निल आवळे हे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यालगत असलेल्या पाणी पुरवठा विभागात आले. ते टेबलवर बसलेले असताना संशयित अजित पाथऊट हा नशेत आला. त्याने आमच्या भागात पाणी वेळेत नाही. महापालिकेच्या कामगारांना मस्ती आली आहे, असे म्हणत स्वप्निल यांना शिवीगाळ करत हल्ला चढविला. त्यानंतर बाजूस पडलेला दगड घेऊन स्वप्निल यांच्या डोक्यात घातला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत.

घडल्या प्रकारानंतर महापाfिलका कर्मचाऱ्यांची संघटना आक्रमक झाली. सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून काम बंद करत महापालिकेवर मोर्चा काढला. तिथे जोरदार निदर्शने व घोषणाबाजी केली. कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. संबंधीत हल्लेखोराविरोधात तक्रार दिली. हल्लेखोरावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.