Gadhinglaj Crime | नूल गाव हादरलं! रात्री ९.३० च्या सुमारास नव्या घरात असं काय घडलं? ज्यामुळे गावात पसरली भीतीची छाया...
नूल -कौटुंबिक वादातून राग अनावर झाल्याने पत्नी चित्रांजली भिमाप्पा चितारी (वय ३८, रा. नूल) हिच्यावर धारधार विळ्याने सपासप वार करुन पती भीमाप्पा चंद्राप्पा चितारी (वय ४३) याने निघृण खून केला. रविवारी रात्री नूल येथे झालेल्या या खुनाची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली असून संशयीत भीमाप्पा याला न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी दिली आहे.
घटनास्थळ आणि पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, पती भीमाप्पा आणि त्याची पत्नी चित्रांजली या दोघांच्यात बऱ्याच दिवसापासूनकौटुंबिक, चारित्र्याचा संशय आणि आर्थिक कारणावरून वाद होत होता. नूल गावातीलच जुन्या घरात भीमाप्पा तर खणदाळ मार्गावरील नव्या घरात चित्रांजली असे वेगवेगळे राहात होते.
मुलगा आणि मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने नव्या घरात चित्रांजली एकटीच रहात होती. चारित्र्याचा संशय आणि चांगली बागणूक चित्रांजली देत नसल्याने त्यांचात कायम वाद होता. रविवारी या वादाचे पर्यावसान जीवघेण्यापर्यंत पोहचले. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खणदाळ मार्गावरील चित्रांगली राहात असणाऱ्या नव्या घरात दोघांच्यात जोराचा बाद झाला. या रागाच्या भरात भीमाप्पाने विळ्याने चित्रांजलीच्या गळ्यावर, हातावर, छातीवर सपासप बार केले. यातच जोराचा रक्तस्त्राव झाल्याने ती जागीच मयत झाली.
पत्नीवर वार केल्यानंतर भीमाप्पा तेथून पळून जावून शेतात लपून बसला. पती-पत्नीत होत असणाऱ्या वादाकडे शेजाऱ्यांनी सुरवातीस दुर्लक्ष केले. पण काही वेळानंतर काहीतरी घडल्याचे शेजाऱ्यांना समजल्यावर त्यांनी तातडीने पोलीस पाटील - परशराम सरनाईक यांना कळविले. सरनाईक यांनी महिलेचा खून झाल्याचे पाहून गडहिंग्लज पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चित्रांजली हिचा खून झाल्याचे दिसताच तेथूनच बिळा जप्त करत शेतात लपून बसणाऱ्या भीमाप्पा याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या खुनाची फिर्याद पोलीस पाटील परशराम सरनाईक यांनी दिली असून अधिक तपास - पोलिस निरिक्षक सतीश होडगर हे करत आहेत. सकाळी शवचिच्छेदन करुन चित्रांजली हिच्यावर नूल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.