Ananya Banerjee Controversy कंडोमचा ढीग, मसाज मशीन अन् बरंच काही...नगरसेविकेच्या कार्यालयात प्रवेश करताच सगळेच अवाक...
02:40 PM Jun 16, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राजकिय धक्के आणि हिंसा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी, काकोली घोष ही नावं चर्चेत होती पण आता मात्र तृणमूल काँग्रेसच्या एका नगरसेविकेची देशभरात चर्चा सुरु आहे. अत्यंत आक्षेपार्ह गोष्टी कार्यालयात सापडल्याने नगरसेविका अनन्या बॅनर्जी चर्चेत आल्या आहेत.
Advertisement
कोलकाताच्या वॉर्ड १०९ च्या तृणमूल नगरसेविका अनन्या बॅनर्जी नेहमीच चर्चेत असतात, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या मुकुंदपूर येथील कार्यालयात जे घडले, त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनन्या बॅनर्जी यांच्या कार्यालयात कंडोमचा खच, मसाज मशीन आणि काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अनन्या बॅनर्जी कोण आहेत?
Advertisement
अनन्या बॅनर्जी या कोलकाता महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या बंगाली चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आणि मॉडेल होत्या. २००० साली 'मिस कलकत्ता' हा किताब जिंकल्यानंतर अनन्या यांनी ग्लॅमरच्या दुनियेतून राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांना तृणमूल काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा मानले जाते आणि त्यांनी महिला विकासाशी संबंधित अनेक आयोगांवर काम केले आहे. मात्र, त्यांची कार्यनिष्ठा आणि वादग्रस्त मुद्दे त्यांना नेहमीच चर्चेत ठेवतात.
कार्यालय की व्यभिचाराचा अड्डा?
सोमवारी मुकुंदपूरमधील नगरसेवकाच्या कार्यालयातील दृश्य हे एका सामान्य सरकारी कार्यालयासारखे अजिबात नव्हते. आतमध्ये विखुरलेली रोकड, मसाज मशीन आणि कंडोमची पाकिटे पाहून भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी थक्क झाले. आरोपानुसार, तिथे एक खास मेकअप रूमदेखील उभारण्यात आली होती. प्रश्न असा निर्माण होतो की, सरकारी कार्यालयांचा वापर अशा कामांसाठी केला जावा का? या घटनेनंतर नागरिकांच्या मनात संतापाचा उद्रेक झाला.
हा वाद इथेच संपत नाही. कार्यालयातून एक 'यलो लेजर' (पिवळी नोंदवही) जप्त करण्यात आली असून, भरती घोटाळ्याचा हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. आंदोलकांचा दावा आहे की, या नोंदवहीमध्ये सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवलेल्या लोकांची नावे आहेत. आरोग्य विभाग आणि इतर महानगरपालिका विभागांमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली ही कथित योजना बऱ्याच काळापासून सुरू आहे.
नगरसेवकाचे स्पष्टीकरण आणि प्रश्नांचा भडीमार
गदारोळानंतर नगरसेविका अनन्या बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्याकडे कार्यालयाच्या चाव्या नाहीत. त्यांनी सापडलेले साहित्य ईदच्या वेळी दान करण्यासाठी असलेल्या वस्तू असे केले. मात्र, कंडोम आणि मसाज मशीनसारख्या अत्यंत वैयक्तिक आणि आक्षेपार्ह वस्तूंवर त्या गप्प राहिल्या. ८ जूनपासून आपण त्या कार्यालयात गेलो नसल्याचा त्यांचा दावा आहे. पोलिसांच्या तपासानंतरच सत्य समोर येईल, पण सध्या बंगालमध्ये अनन्या बॅनर्जी यांचीच चर्चा आहे.
Advertisement