For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भविष्यातील युद्धासाठी सैन्यात ‘एसटीईएजी’ युनिट

06:34 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
भविष्यातील युद्धासाठी सैन्यात ‘एसटीईएजी’ युनिट
Advertisement

सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युशन अँड अडॉप्टेशन ग्रुप स्थापन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भविष्यातील युद्धांचे स्वरुप विचारात घेत भारतीय सैन्याने फ्यूचर आर्मीची तयारी सुरू केली आहे. सैन्याने सिग्नल टेक्नोलॉजी इव्हॅल्युशन अँड अडॉप्टेशन ग्रुप (एसटीईएजी) नावाने एक एलिट युनिट स्थापन केले आहे. हे युनिट  भविष्यातील दूरसंचार तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, 5जी, 6जी, मशिन लर्निंग, क्वांटम टेक्नॉलॉजी इत्यादीवर संशोधन करत त्यांचे मूल्यांकन करणार आहे. या तंत्रज्ञानांचा वापर सैन्याकडून केला जाणार आहे.

Advertisement

सैन्यमोहिमेसाठी कम्युनिकेशन अत्यंत आवश्यक आहे. युद्धभूमीसाठी तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. ज्या सैन्याकडे सर्वात प्रभावी कम्युनिकेशन सिस्टीम असेल आणि जो वेगवेगळ्या सैनिकांदरम्यान माहिती जलदगतीने पोहोचविण्यास सक्षम होईल तोच शत्रूवर वरचढ ठरणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

कर्नल स्तरीय अधिकारी करणार नेतृत्व

आधुनिक युद्धात सैन्य कारवाईदरम्यान विविध युनिट्स आणि सैन्यदलांना परस्परांमध्ये संपर्क साधण्यासाठी नव्या उपकरणांची मोठी आवश्यकता असते. हीच आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एसटीईएजीची स्थापना करण्यात आली आहे. हे नवे तंत्रज्ञान अवलंबिण्यात भारतीय सैन्याला मदत करणार आहे. यामुळे आमच्या 12 लाख सैनिकांची डिजिटल युद्धक्षमता आणखी मजबूत होणार आहे. कर्नलस्तरीय अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसटीईएजी सर्व प्रकारच्या तार आणि बिनतारी संचार उपकरणांवर काम करणार आहे. यात टेलिफोन एक्सचेंज, मोबाईल कम्युनिकेशन, खास सॉफ्टवेअरयुक्त येडिओ, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर, 5जी आणि 6जी नेटवर्क, आधुनिक क्वांटम तंत्रज्ञान, एआय आणि मशीन लर्निंग यासारख्या गोष्टी सामील असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

भविष्यातील युद्धासाठी मोठे प्लॅनिंग

खास तंत्रज्ञानांचा वापर करणे, नव्या संशोधनांचा लाभ उचलणे आणि संरक्षण क्षेत्रात या तंत्रज्ञानांच्या वापराच्या पद्धती शोधण्याच्या क्षमतेने या युनिटला सज्ज करण्यात येणार आहे. याकरिता शिक्षणजगत आणि उद्योजगताची मदत घेतली जाणार आहे. एसटीईएजी युद्धासाठी आवश्यक संचार तंत्रज्ञानांचा शोध घेणे, तंत्रज्ञानांची उपयुक्तता पारखणे, विकसित करणे अणि त्यांचे व्यवस्थापन करणार आहे. तसेच उपलब्ध तंत्रज्ञानांची देखभाल तसेच त्यांना अद्ययावत करणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.