For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साताऱ्यात उभारणार लोकशाहीर अण्णाभाऊंचा पुतळा

03:43 PM Mar 12, 2025 IST | Radhika Patil
साताऱ्यात उभारणार लोकशाहीर अण्णाभाऊंचा पुतळा
Advertisement

सातारा : 

Advertisement

'जग बदल घालूनी घाल, सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात, रुतून बसला का ऐरावत, अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवर्ती घाव’ या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेने समाजात बदल घडवण्यासाठी त्या काळात काम केले. त्यांची प्रेरणा सातारकरांना मिळावी, याकरता सातारकरांच्या मागणीनुसार सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल 12 फूट उंच, 2 टन वजनाचा ब्रांझ धातूचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभा केला जात आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सकारात्मक प्रयत्नांतून होत आहे.

राजधानी साताऱ्याला बरेच ऐतिहासिक कंगोरे आहेत. शहराची निर्मिती छत्रपती शाहू महाराजांनी केलेली असून याच साताऱ्याला अनेक थोर महंताचे पदस्पर्श लागलेले आहेत. त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राजधानी साताराचेही एक वेगळे नाते आहे, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणारे रिपाईं आठवले गटाचे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ गालफाडे हे सांगतात. त्यांच्या भव्य पुतळ्यासाठी प्रशासनाकडे मागणी केल्यानुसार पालिकेच्या प्रशासनाकडून त्यास ग्रीन सिग्नल मिळाला. त्या कामास मंजुरीही मिळाली. कामाला सुरुवात झाली. सर्व काम चांगल्या पद्धतीचे आणि दर्जेदार अशा पद्धतीचे होत आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी हे काम चांगल्या पद्धतीचे करण्यासाठी सक्त सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाकडून कामाची सुरुवात होण्यापूर्वीच सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते.

Advertisement

लोकशाहीर अण्णाभाऊ यांचा पुतळा कसा असावा, त्या पुतळयाची उंची किती असावी, त्याचा चबुतरा किती असावा, परिसरात कशा पद्धतीची सजावट असावी याचे अभ्यासपूर्ण नियोजन करुन तज्ञ आर्किटेक्टकडून त्यावर कामकाज करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हे काम टप्याटप्याने हाती घेतले आहे. आता या कामात एका बाजूला पुतळा तयार करण्याचे काम आहे. तर दुसऱ्या बाजूला पुतळा बसवण्याच्या ठिकाणी चबुतरा तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. बऱ्यापैकी हे काम प्रगतीपथावर आहे.

  • काम चांगल्या दर्जाचे होत आहे

सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांच्यामुळे साताऱ्यात भव्यदिव्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्या कामात दर्जा असून कसलीही उणीव राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. आम्ही दररोज या कामाकडे वैयक्तिक लक्ष देत असतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहेत.

                               किशोरभाऊ गालफाडे रिपाईं आठवले गट, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष

Advertisement
Tags :

.