पुतळा म्हणजे स्मारक नव्हे!
उद्धव ठाकरे यांची माहिती : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण
मुंबई / प्रतिनिधी
मागील काही वर्षांपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा सुरू आहे. मात्र आता स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. तर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. याप्रसंगी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्मारकाच्या ठिकाणी जात पहाणी केली. यावेळी ठाकरे यांनी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाही ते सर्व उद्घाटनाला येऊ शकतात असे सांगताना ‘पुतळा म्हणजे स्मारक’ होऊ शकत नसल्याचेही विधान उद्धव ठाकरे यांनी केले. ते मुंबईतील विशेष पत्रकार परिषदेत स्मारकाची माहिती देताना बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आगामी सहा महिन्यात स्मारकाचा पुढचा टप्पा सुरू होईल. ज्या ठिकाणी स्मारकाची जागा आहे त्या ठिकाणाहूनच जनतेशी भेटीगाठी सुरू झाल्या. त्या ठिकाणी शिवाजी पार्क आहे. या शिवाजी पार्कच नाव 1927 साली पडले. त्याच वर्षी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता. ही वास्तू वारसा ठरणार आहे, असे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, हे स्मारक भूमिगत असून यातून हेरिटेज वास्तूला अडथळा ठरणार नाही. गेले काही वर्षे या स्मारकावर चर्चा आणि काम सुऊ आहे. येथील महापौर बंगला हे स्मारकासाठी प्रमुख आव्हान असून महापौर वास्तूला आम्ही भावनेने जोडले गेलो आहोत. या ठिकाणी शिवसेनेच्या तसेच महायुतीच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. या वास्तूचे वैभव जपून काम करणे आव्हान होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामकाजाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात काम सुरु होईल. या दोन्ही टप्प्यांचे कामकाज 23 जानेवारी 2026 च्या आधी पूर्ण होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बैठकांमध्ये डावल्याने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक नाराज
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतर ठाकरे गटाचे काही नगरसेवक शिंदे गटाकडे वळले. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उरलेसुरले माजी नगरसेवकही शिंदे गटाकडे वळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ठाकरे गटासाठी चिंतेची बाब ठरणार आहे.