For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘त्या’ व्यावसायिकांचे पोलीस आयुक्तांनाही निवेदन

10:53 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘त्या’ व्यावसायिकांचे पोलीस आयुक्तांनाही निवेदन
Advertisement

बेळगाव : महात्मा फुले मार्केटमधील व्यावसायिकांनी पोलीस आयुक्तांनाही निवेदन देऊन आम्हाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही व्यवसाय करीत आहे. तरीदेखील आम्हाला काहीजण दमदाटी करीत आहेत. तेव्हा तातडीने याची दखल घेऊन संबंधितांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महात्मा फुले मार्केटमधील व्यावसायिकांना काहीजण आम्हालाच भाडे द्या, असे सांगून त्यांना दमदाटी करीत आहेत. महानगरपालिकेचे गाळे असून आम्हाला महानगरपालिकेनेच हे गाळे दिले आहेत. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेशीच व्यवहार करणार आहेत. मात्र इनामदार कुटुंबीय आपली जागा आहे, तेव्हा आपल्याशी करार करा, असे म्हणत आम्हाला नाहक त्रास देत आहेत. तेव्हा संबंधितांना सक्त ताकीद करून आम्हाला संरक्षण द्या, असे या निवेदनात म्हटले आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एस. बी. मलकाचे, सुशिल बेळगुंदकर, गिरीश पाटणकर, महेश निकम, उत्तम चौगुले, ललित चव्हाण, युवराज पाटील यांच्यासह इतर व्यावसायिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.