For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भालावल शाळेच्या शतक महोत्सवी सोहळ्याचा शानदार शुभारंभ

03:36 PM Dec 08, 2023 IST | अनुजा कुडतरकर
भालावल शाळेच्या शतक महोत्सवी सोहळ्याचा शानदार शुभारंभ
Advertisement

तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

ओटवणे |प्रतिनिधी

भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन करून करण्यात आला.

Advertisement

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी उपसभापती विनायक दळवी, युवा सामाजिक कार्यकर्ते सुरज परब, मालवणी कवी दादा मडकाईकर, सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पिए रामचंद्र आंगणे, जेष्ठ ग्रमस्थ झिलु परब, तलाठी नेत्रा सावंत, ग्रामपंचायत सदस्य अमित गुळेकर, ऋषाली परब, गंघा गावडे, ग्रामसेवक तृप्ती राणे, शतक महोत्सव समिती अध्यक्ष महेश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम परब, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नम्रता कोठावळे, माजी उपसरपंच अशोक परब, वामन परब, श्रीकृष्ण परव, अशोक परब, अपूर्वा सावंत, सई सावंत, गंगाराम परब, भिवा परब, अर्चना परब, स्नेहा परब आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राजन पोकळे यांनी हजारो विद्यार्थी घडवलेल्या भालावल प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव साजरा होत आहे. ही आनंदाची व कौतुकाची बाब असून या शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विनायक दळवी यांनी गावातील शाळेच्या शतक महोत्सवाच्या माध्यमातून भालावल गावची झालेली एकजूट या शाळेसह गावाच्या सर्वांगीण विकासाकडे नेणारी आहे. त्यामुळे या गावाच्या उपक्रमासाठी यापुढेही मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दादा मडकईकर यांनी मालवणी कविता सादर करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली.

दरम्यान माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनीही शाळेच्या या शतक महोत्सवी सांगता सोहळ्याला भेट देऊन शाळेचा शतक महोत्सवी सोहळा एकजुटीने साजरा करीत असल्याबद्दल भालावलवासीयांचे कौतुक करीत शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी मदतीची ग्वाही दिली
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन उदय परब यांनी केले तर आभार शिक्षक विठ्ठल कुंभार यांनी मानले.

Advertisement
Tags :

.