महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हेर्ले गावभाग फाट्यानजीक मोटरसायकलला भरधाव तवेराची धडक 

12:54 PM Dec 15, 2024 IST | Radhika Patil
A speeding car hit a motorcycle near the junction in Herle village.
Advertisement

हेर्ले : 

Advertisement

कोल्हापूर - सांगली महामार्गावर हेर्ले गावभाग फाट्याजवळ भरधाव तवेराने पाठीमागुन स्पेलंडर मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील महंमद धोंडीबा खतीब (वय 55 वर्ष) रा. हेर्ले ता. हातकणंगले हे जागीच ठार झाले तर राजेंद्र दत्तू माने (वय 59) रा. हेर्ले हे गंभीर जखमी झाले.

Advertisement

पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, अपघात सकाळी नऊ वाजता घडला हेर्ले येथील राजेंद्र दत्तू माने व महंमद धोंडीबा खतीब हे आपले शेतातील काम आटोपून घरी निघाले होते. गावभाग फाट्याजवळ मोटर सायकल वरून रस्ता ओलांडत असताना मिरजेहून कोल्हापूर कडे भरधाव वेगाने निघालेल्या तवेराने पाठीमागुन मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये महंमद खतीब हे मोटरसायकल वरून उडून खाली पडले व त्यांच्या अंगावरून तवेरा गेल्यामुळे ते जागीच ठार झाले. तर मोटरसायकल वरील राजेंद्र दत्तू माने हे गंभीर जखमी झाले.तवेराने जोराची धडक दिल्यामुळे मोहम्मद खतीब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.अपघात होताच तवेरा चालकाने पलायन केले.गावातील युवकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. अपघाताची माहिती समजतात गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन राजेंद्र माने यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. अपघात पाहण्यासाठी ग्रामस्थांची व  अपघातामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी हातकणंगले पोलिसांनी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. मृत महंमद खतीब हे शेतमजूर असून यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article