For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंदोरमध्ये ट्रकला धडकली भरधाव कार

06:19 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंदोरमध्ये ट्रकला धडकली भरधाव कार
Advertisement

राज्याच्या माजी गृहमंत्र्यांच्या कन्येचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ इंदोर

मध्यप्रदेशच्या इंदारेमध्ये एक भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका भरधाव कारची ट्रकशी टक्कर झाली. दुर्घटनेत मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा हिच्यासमवेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झाला आहे. तर कारमधून प्रवास करणारी युवती जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे 5.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कारमधील युवक-युवती हे पार्टी करून परतत असताना ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये प्रेरणा बच्चन, प्रखर कासलीवाल आणि मान संधू यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनुष्का राठी जखमी झाली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.