For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

14 कोटी मैल अंतरावरून पृथ्वीवर खास सिग्नल

07:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
14 कोटी मैल अंतरावरून पृथ्वीवर खास सिग्नल
Advertisement

नासाने केला महत्त्वाचा खुलासा

Advertisement

वृत्तसंस्था /सॅन फ्रान्सिस्को

पृथ्वीला दुर्गम अंतराळातून एक खास सिग्नल मिळाला आहे. हा सिग्नल सुमारे 140 दशलक्ष मैल अंतरावरून प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने याचा खुलासा केला आहे. नासाला नवे अंतराळयान साइकीकडून सिग्नल मिळाला आहे. हा सिग्नल 140 दशलक्ष मैल (226 दशलक्ष किलोमीटर) अंतरावरून आला आहे. सूर्य आणि पृथ्वीवरील अंतराच्या हे प्रमाण दीडपट इतके आहे. नासाने 13 ऑक्टोबर 2023 रोजी एक अंतराळयान प्रक्षेपित केले होते. हे यान साइकी नावाच्या लघूग्रहाकडे पाठविण्यात आले हेत. साइकी नावाचा लघूग्रह मंगळ आणि गुरु ग्रहादरम्यान आहे. साइकीमध्ये डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स एक्सपेरिमेंट सिस्टीम लावण्यात आली आहे. साइकीच्या रेडिओ फ्रीक्वेंसी ट्रान्समीटरसोबत जोडले गेल्यावर कम्युनिकेशन्सने 140 दशलक्ष मैल म्हणजेच 14 कोटी मैलाच्या अंतरावरून इंजिनियरिंगची डाटाची एक कॉपी पाठविली आहे. नासासाठी ही अत्यंत मोठी कामगिरी मानली जात आहे, कारण ही जटिल विज्ञानाच्या माहितीसोबत एचडी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या आदा-प्रदानाला सक्षम करत हायर डाटा रेट कम्युनिकेशन्सला सक्षम करणार आहे. लेझर तंत्रज्ञानाला दुर्गम अंतराळातून डाटा 10 ते 100 पट अधिक वेगाने संचारित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.