For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

130 डेसिबलचा आवाज

06:35 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
130 डेसिबलचा आवाज
Advertisement

या पक्ष्याच्या आवाजासमोर सर्व पक्षी फीके

Advertisement

दक्षिण अमेरिकेच्या जंगलांमध्ये आढळून येणारा बेयर-थ्रोटेड बेलबर्ड स्वत:च्या तीव्र आवाजासाठी चर्चेत आहे. नर बेलबर्डचा आवाज 130 डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतेचा असू शकतो. नव्या अध्ययनात वैज्ञानिकांनी 123 पक्ष्यांच्या आवाजाचे अध्ययन केले आणि मोठे शरीर आणि रुंद चोच असलेले पक्षी अधिक तीव्र आवाज काढू शकतात असे त्यांना आढळून आले.

वैज्ञानिकांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, काही पक्ष्यांचा आवाज इतका तीव्र का असतो. यासाठी अमेरिका आणि ब्राझीलच्या विविध ठिकाणांवर पक्ष्यांचा आवाज रिकॉर्ड करण्यात आला. अध्ययनात 123 प्रजातींना सामील करण्यात आले. यातील 113 प्रजातींच्या आवाजाविषयी अशाप्रकारचा डाटा पूर्वी उपलब्ध नव्हता. हे संशोधन जर्नल इवोल्युशनमध्ये प्रकाशित झाले आहे.

Advertisement

बेयर-थ्रोटेड बेलबर्डचे शास्त्राrय नाव प्रोक्नियास न्यूडिकोलिस आहे. नर पक्षी पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याच्या गळ्यानजीक निळ्या-हिरव्या रंगाचा हिस्सा असतो. परंतु याचे सर्वात खास वैशिष्ट्या याचा तीव्र आवाज आहे. संशोधनात बेयर-थ्रोटेड बेलबर्ड आणि रेड-लेग्ड सेरिएमाला सर्वात तीव्र आवाज असलेल्या पक्ष्यांमध्ये सामील करण्यात आले आहे.

या पक्ष्यांचा आवाज 120 डेसिबलपेक्षा अधिक वर पोहोचू शकतो. अध्ययनात नेंद सर्वात तीव्र आवाज सुमारे 122 डेसिबलचा होता. तर बेलबर्डचे काही तीव्र कॉल 130 डेसिबलपेक्षा अधिकच्या पीकपर्यंत पोहोचू शकतात. सामान्य संभाषण सुमारे 60 डेसिबलचे असते, म्हणजेच या पक्ष्यांचा आवाज सामान्य संभाषणापेक्षा अनेक पट अधिक तीव्र असू शकतो. अध्ययनात सर्वात शांत आणि सर्वात वेगवान पक्ष्यांच्या आवाजात सुमारे 58 डेसिबलचे अंतर आढळून आले.

मोठ्या चोचीतून निघतो तीव्र आवाज

अध्ययनात ज्या पक्ष्याचे शरीर मोठे असते, त्याचा आवाजही सर्वसाधारणपणे अधिक तीव्र असतो अशी बाब समोर आली. अशाचप्रकारे ज्या पक्ष्यांची चोच अधिक रुंद असते, ते देखील तीव्र आवाज काढू शकतात. मोठे पक्षी अधिक हवा आणि श्वासाचा दबाव निर्माण करू शकतात, यामुळे आवाज तीव्र होऊ शकतो. तर रुंद चोच आवाजाला बाहेर काढण्यास मदत करू शकतात. म्हणजेच पक्ष्याचे शरीर आणि त्याची चोच केवळ खाण्याचे काम करत नाही, तर त्याचा आवाज काढण्याच्या पद्धतीशीही कनेक्शन असू शकते.

तीव्र आवाज का काढतात?

काही पक्ष्यांना इतका तीव्र आवाज काढण्याची गरज का भासते असा प्रश्न आता वैज्ञानिकांसमोर आहे. संशोधक पथकाने पक्ष्यांचे राहण्याचे ठिकाण, उ•ाणाची क्षमता आणि त्याच्या प्रजनन व्यवहार यासारख्या गोष्टी पाहिल्या, परंतु यातील कुठलेही एक असे कारण मिळाले नाही, जे सर्व तीव्र आवाज असलेल्या पक्ष्यांवर लागू होईल. याचमुळे काही पक्षी इतका तीव्र आवाज कसा काढतात, ते असे का करतात आणि याचे उत्तर अद्याप स्पष्ट नाही. या संशोधनातून पक्ष्यांचा आवाज आणि त्याच्या शरीरादरम्यान संबंध समजून घेण्यास मदत मिळाली आहे. यापुढील काळात पक्ष्यांच्या आवाजाचा डाटा जमवून वैज्ञानिक अखेर निसर्गाने काही पक्ष्यांना इतका तीव्र आवाज का दिला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतात.

Advertisement
Tags :

.