For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत ‘स्नो इमर्जन्सी’ जाहीर

06:58 AM Jan 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत ‘स्नो इमर्जन्सी’ जाहीर
Advertisement

हिमवादळाचा तडाखा : देशात भीतीचे वातावरण : 6,000 हून अधिक विमान उड्डाणांवर परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

अमेरिका सध्या अत्यंत धोकादायक हिवाळी वादळाच्या तडाख्यात सापडला आहे. जोरदार बर्फवृष्टी, मुसळधार पाऊस आणि जीवघेणी थंडी यामुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या 6,000 हून अधिक विमान उ•ाणे रद्द करण्यात आली असून परिस्थिती गंभीर बनली आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये ‘स्नो इमर्जन्सी’ लागू करण्यात आली असून स्नो इमर्जन्सी रूटवरून वाहने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथे किमान 9 इंच बर्फ पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर फ्रीझिंग रेनमुळे परिस्थिती आणखी धोकादायक होऊ शकते.

Advertisement

जगाच्या राजकारणात आक्रमक भूमिका घेत अमेरिकेने ग्रीनलँडसंदर्भात केलेले दावे, इराणसोबत वाढलेला तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकाधिक हुकुमशाहीकडे झुकणारी वृत्ती यामुळे अमेरिका आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावाखाली आहे. अशा अस्थिर राजकीय वातावरणातच आता निसर्गानेही अमेरिकेला जबरदस्त धक्का दिला असून, देश भीषण हिवाळी वादळाच्या तडाख्यात सापडला आहे. हवाई सेवा ठप्प झाल्यामुळे लाखो नागरिकांचे प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. भारतीय विमान वाहतुकीलाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांचे वेळापत्रक कोलमडले आहे. अमेरिकेत शनिवारी 2,836 हून अधिक उ•ाणे रद्द झाली, तर रविवारसाठीची नियोजित 3,587 फ्लाइट्स रद्द करण्यात आली आहेत. गेल्या एका वर्षातील हा अमेरिकेसाठी सर्वात वाईट रविवार ठरल्याचे सांगितले जात आहे.

17 राज्यांत आणीबाणी

हिम वादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील किमान 17 राज्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. यात अलाबामा, आर्कान्सास, जॉर्जिया, कॅन्सस, केंटकी, लुईझियाना, मेरीलँड, मिसिसिपी, मिसूरी, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया, साउथ कॅरोलिना, टेनेसी, टेक्सास, व्हर्जिनिया तसेच वॉशिंग्टन डीसीचा समावेश आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

हजारो मैलांपर्यंत वादळाचा कहर

हे भीषण वादळ सुमारे 1,500 मैलांपर्यंत पसरू शकते, तर काही अंदाजानुसार 2,000 मैलांहून अधिक क्षेत्र त्याच्या प्रभावाखाली येऊ शकते. टेक्सासपासून न्यू इंग्लंडपर्यंत हिमवृष्टी आणि बर्फाळ वाऱ्यांचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येला शून्य अंशाखालील तापमानाचा सामना करावा लागू शकतो.

दक्षिण अमेरिकेला सर्वाधिक धोका

वादळाचा सर्वाधिक फटका अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॅलस, लिटल रॉक (आर्कान्सास), मेम्फिस, नॅशव्हिल (टेनेसी), अटलांटाच्या उत्तरेकडील परिसर, शार्लट, रॅली (नॉर्थ कॅरोलिना), रोअनोक (व्हर्जिनिया) आणि वॉशिंग्टन डीसी येथे परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.