एका छोट्या उपकरणाने दाखविली कमाल
इराणमध्ये संकटात सापडलेल्या वैमानिकाला अमेरिकेने काढले शोधून
अमेरिकेने इराणच्या दुर्गम पर्वतीय क्षेत्रात दोन दिवसांपासून शत्रूपासून लपलेल्या स्वत:च्या वैमानिकाला सकुशल जिवंत वाचविले आहे. ही मोहीम एखाद्या करिष्म्यापेक्षा कमी नाही कारण अमेरिकेने ही मोहीम अशा देशात राबविली आहे, ज्या इराणशी तो महिन्याभरापासून युद्ध लढत आहे. वैमानिकाला शोधण्यासाठी अमेरिकेची अनेक विमाने गस्त घालत राहिली आणि त्याला शोधत राहिली. वैमानिकाला शोधून काढण्यास एका छोट्या उपकरणाने अत्यंत कमाल केली. या उपकरणाने लोकेशन समवेत अन्य तपशील अमेरिकेच्या सैन्याकडे पाठविले. याच्याच माध्यमातून वैमानिक ओबडधोबड पर्वताच्या भेगेत लपून असल्याचे कळले होते.
कोणते उपकरण?
या पूर्ण अभियानाच्या केंद्रस्थानी जवळपास 800 ग्रॅम वजनाचे एक छोटे, उपग्रह आधारित कम्युनिकेशन डिव्हाइस असून त्याला सीएसईएल (कॉम्बॅट सरवायवर इवेडर लोकेटर) नावाने ओळखले जाते. हे उपकरण बोइंग कंपनीने निर्माण केले असून हे उपग्रहाशी जोडलेले असते. हे उपकरण आकाराने तळहातात मावणारे आहे आणि मजबूत सैन्य रेडिओ तसेच एक हँडहेल्ड कॉम्प्युटरशी मिळतेजुळते रुपासारखे दिसते. हे वैमानिकाच्या कंबरेच्या हिस्स्यात बांधले जाते, जेणेकरून एखाद्या दुर्घटनेवेळी वैमानिकाने लढाऊ विमानातून उडी घेतल्यास हे उपकरण त्याच्यासोबतच रहावे. वैमानिकाने इजेक्ट करताच हे त्वरित एन्क्रीप्टेड डाटा पाठवू लागते. हे तीव्र फ्रीक्वेंसी-हॉपिंग सिग्नल्सचा वापर करून सातत्याने लोकेशन कोऑर्डिनेट्स आणि छोट्या एन्क्रिप्टेड मेसेज पाठवत राहते, ज्यामुळे शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टीमसाठी याचा शोध लावणे अत्यंत अवघड ठरते.
10 मीटर खोल पाण्यातही उपयुक्त
हे उपकरण कुठल्याही स्थितीत काम करणे बंद करत नाही. विमान दुर्घटनेवेळी फ्लाइटचा ब्लॅकबॉक्स ज्याप्रकारे खराब होत नाही आणि अखेरच्या क्षणांना कैद करतो, त्याचप्रकारे हे उपकरण सैनिक किंवा वैमानिकाशी कनेक्ट राहते. याच्या माध्यमातूनच अमेरिकेचे सैन्य स्वत:च्या वैमानिकाचा ठावठिकाणा शोधू शकले. हे उपकरण 10 मीटर पाण्यात बुडाल्यावरही योग्य लोकेशन पाठवते. तसेच या उपकरणाची बॅटरी 21 दिवसांपर्यंत चालते. यात लावलेल्या एका बटनद्वारे वैमानिक किंवा कुठलाही सैनिक आपण संकटात आहोत हे कळवू शकतो. ज्यानंतर त्याला वाचविण्याची प्रक्रिया सुरू होते. या अभियानादरम्यान देखील उपकरणाने दर काही तासांनी स्वत:च्या अचूक लोकेशनची माहितीयुक्त एन्क्रिप्टेड टेक्स्ट मेसेज पाठविले, ज्यामुळे इराणी सैन्य त्याच्या लोकेशनचा थांगपत्ता लावू शकले नाही.

उपकरणामुळे वाचला वैमानिकाचा जीव

-800 ग्रॅम वजनाचे उपग्रह आधारित कम्युनिकेशन डिव्हाइसमुळे वाचला अमेरिकेच्या वैमानिकाचा जीव. तळहातावर मावू शकेल इतक्याच आकाराचे इलेक्ट्रॉनिक उपकरण.
-कॉम्बॅट सरवायवर इवेडर लोकेटर नाव असलेल्या उपकरणाची बोइंग कंपनीकडून निर्मिती. सैन्य रेडिओ अन् हँडहेल्ड कॉम्प्युटरसारखे सीएसईएल या उपकरणाचे आहे स्वरुप.
-वैमानिकाच्या कंबरेला बांधले जाते उपकरण. दुर्घटनेच्या स्थितीत वैमानिकासोबतच उपकरण राहण्यासाठी खबरदारी. वैमानिकाने इजेक्ट करताच पाठवू लागते इन्क्रीप्टेड डाटा.
-तीव्र फ्रीक्वेंसी-हॉपिंग सिग्नल्सचा वापर करत सातत्याने लोकेशन कोऑर्डिनेट्स आणि छोट्या एन्क्रिप्टेड मेसेज पाठवत राहते, शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टीमला लागत नाही सुगावा.
-सीएसईएल या उपकरणाची बॅटरी 21 दिवसांपर्यंत चालते. उपकरणातील एका बटनद्वारे वैमानिक किंवा कुठलाही सैनिक संकटात असल्याचे त्वरित स्वत:च्या कमांडला कळवू शकतो.
कठिण स्थितीतही न थांबता काम
सीएसईएलला अत्यंत कठिण स्थितींना विचारात घेत निर्माण करण्यात आले आहे.
-तीव्र झटके अन् हाय जी-फोर्स झेलू शकते.
-पाण्यात पडल्यावरही काम करते.
-अधिक तापमानातही सक्रीय राहते.
टू-वे कम्युनिकेशन आणि ऑथेंटिकेशन
या उपकरणात दुतर्फी टेक्स्ट कम्युनिकेशनची सुविधा असते. म्हणजेच सैनिक केवळ सिग्नल पाठवू शकतो असे नाही तर कमांड सेंटरकडून डायरेक्शनही प्राप्त करू शकते. तो छोटे छोटे मेसेज म्हणजेच इंजर्ड किंवा रेडी टू पिकअप पाठवू शकतो. याचबरोबर यात ऑथेंटिकेशन सिस्टीम असते, ज्यामुळे सिग्नल योग्य व्यक्तीकडून येतोय याची खातरजमा होते. हे वैशिष्ट्या शत्रूकडून खोटे संदेश पाठविण्याची शक्यता संपविते.
मॅप्स अन् इंटेलिजेन्स डाटा
सीएसईएल केवळ लोकेशन पाठवत नाही, तर यात पूर्वीपासून टोपोग्राफिक मॅप्स आणि इंटेलिजेन्स डाटाही लोड असतो. याचा फायदा म्हणजे कुठल्या दिशेने जायचे आहे हे सैनिक स्वत: समजून घेऊ शकतो. यामुळे तो केवळ प्रतीक्षा करण्याऐवजी स्वत:ही सुरक्षित बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो.