For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निर्माण होतोय सहावा महासागर

06:22 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
निर्माण होतोय सहावा महासागर
Advertisement

पृथ्वीवर पाच महासागर आहेत, हे आपल्याला माहीत आहे. तथापि, संशोधकांच्या मते आणखी एका महासागराची निर्मिती या पृथ्वीतलावर होत आहे. भूगर्भात खोलवर या महासागराच्या निर्मितीची प्रक्रिया वेगाने होत असून ती पूर्ण झाल्यानंतर जगाच्या नकाशात मोठे परिवर्तन होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ही अद्भूत भूगर्भीय घटना उत्तर इथियोपिया देशाच्या नजीक समुद्रात घडत आहे. संशोधकांच्या मते आफ्रि       का खंड महाद्वीप हळू हळू दोन तुकड्यांमध्ये विभागले जात आहे. ‘आफ्रिकेचे शिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात हे महाद्वीप दुभंगत आहे. ही दुभांगाची नैसर्गिक प्रक्रिया अत्यंत धिमेपणाने होत असते. या दुभंगातूनच एक मोठी घळ निर्माण होत असून या खोल घळीत तांबड्या समुद्राचे पाणी भरले जात असून त्यातूनच हा सहावा महासागर निर्माण होणार आहे.

Advertisement

आफ्रिकेच्या शिंगाच्या प्रदेशात अफारच्या आखाताचा त्रिकोण आहे. येथे समुद्रतळाशी 60 किलोमीटर लांब आणि 8 मीटर रुंद अशी एक फट केवळ काही दिवसांमध्येच निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. तसेच, या फटीच्या दोन्ही बाजूचा सागरतळ दोन मीटर खचल्याचेही दिसून आले. त्यानंतर काही दिवसांमध्ये ही भूमी 100 मीटरहून अधिक खोल खचली आहे, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. याचाच अर्थ ही फट दिवसेंदिवस अधिकाधिक रुंद होत आहे. कालांतराने या फटीची लांबीही वाढेल आणि एका महासागराच्या निर्मितीचा प्रारंभ होईल. सध्या ही भूगर्भीय प्रक्रिया तिच्या पूर्व प्राथमिक अवस्थेत आहे. आफ्रिकेचे हे महाद्वीप अरेबियन प्रस्तर, सोमालियन प्रस्तर आणि आफ्रिकी प्रस्तर अशा तीन प्रस्तरांच्या संगमामुळे बनले आहे. या महाद्वीपाचा काही भाग आफ्रिका खंडात तर काही भाग आशिया खंडात आहे. हे तीन्ही प्रस्तर आता एकमेकांपासून हळूहळू दूर जात आहेत. त्यामुळे या प्रस्तरांच्या कडेवर असणारी भूमी खचत आहे.

अर्थातच, जसजसे हे प्रस्तर एकमेकांपासून अधिक दूर जातील, तसे या महाद्वीपाला वेढलेल्या महासागरांमधून आणि समुद्रांमधून पाणी या घळीत शिरु लागेल. त्यामुळे एका नव्या महासागराची निर्मिती होईल. अर्थात, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अद्यापी सहस्रावधी वर्षांचा कालावधी लागेल. तसेच, हा नवा महासागर निर्माण होताना सध्या भूमीखंडाची झीज होऊन मोठ्या प्रमाणावर या भूमीखंडांवर असणाऱ्या सृष्टीचा विनाशही होणार आहे. कारण अशा मोठ्या प्रस्तारीय हालचाली कधीही विनाश न होता होत नाहीत. सध्या महत्वाची बाब एवढीच की, नव्या महासागराच्या निर्मितीच्या प्रारंभाचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत.

Advertisement

Advertisement
Tags :

.