For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पावसाचा एक थेंब, अन् संकट सुरू

06:40 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावसाचा एक थेंब  अन् संकट सुरू
Advertisement

स्वत:च्या नाकामुळे शिंकत राहते हे दुर्लभ माकड

Advertisement

पावसाचे थेंब बहुतांश प्राण्यांसाठी सामान्य बाब आहे, परंतु म्यानमारमधील एक दुर्लभ माकड पावसात त्रस्त होऊन जाते. याला म्यानमार स्नब-नोज्ड मंकी म्हटले जाते. याचे शास्त्राrय नाव राइनोपिथेकस स्ट्राइकेरी आहे. याच्या नाकाचे छिद्र वरच्या दिशेने वळलेले आहे. स्थानिक लोकांनुसार पावसात पाणी याच्या नाकात शिरले आणि त्यानंतर हे माकड शिंकू लागते.

हे माकड म्यानमारच्या उत्तर काचिन भागातील पर्वतीय जंगलांमध्ये आढळून येते. हे चीनच्या युन्नान प्रांतातही दिसून येते. वैज्ञानिकांनी या प्रजातीची ओळख 2010 मध्ये पटविली होती. 2011 मध्ये याविषयी वैज्ञानिक माहिती प्रकाशित झाली. आज हे जगातील सर्वात दुर्लभ माकडांमध्ये सामील आहे. आययूसीएनच्या रेड लिस्टमध्ये याला क्रिटिकल एंडेंजर्ड श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

वरच्या दिशेने वळलेले नाक

या माकडाची सर्वात खास गोष्ट याचे नाक आहे. याच्या नाकाचे छिद्र वरच्या बाजूला आहे. याच्या शरीराचा रंग बहुतांश काळा असतो. कानांजवळ आणि हनुवटीवर पांढरे केस असतात. याचे शेपूट देखील अत्यंत लांब असते. वैज्ञानिकांना पावसात याच्या शिंकण्याची माहिती स्थानिक शिकाऱ्यांकडून मिळाली होती. त्यांच्यानुसार पावसाचे थेंब नाकात शिरताच हे माकड शिंकू लागते.

पावसावेळी हे स्वत:चा चेहरा गुडघ्यांमध्ये लपवून बसते असे सांगण्यात आले होते. परंतु वैज्ञानिकांनी दीर्घकाळापर्यंत जंगलात या माकडांवर नजर ठेवली, पावसात अशाप्रकारे चेहरा लपवून ठेवण्याचे वर्तन स्पष्टपणे नोंद झालेले नाही. याचमुळे पावसात शिंकणे आणि चेहरा लपविण्याची बाब स्थानिक लोकांची माहिती म्हणून मानली जाते.

पर्वतीय जंगलांमध्ये अधिवास

म्यानमार स्नब-नोज्ड मंकी थंड अन् आर्द्रतायुक्त पर्वतीय जंगलांमध्ये राहते. आययूसीएननुसार हे सुमारे 1720 ते 3190 मीटरपर्यंतच्या उंचीयुक्त भागांमध्ये आढळून येते. हे माकड म्यानमारसोबत चीनच्या युन्नान भागात दिसून येते. दोन्ही देशांच्या सीमेनजीक याचे काही समूह आढळून आले आहेत. वैज्ञानिकांनी या समुहांवर देखील संशोधन केले आहे.

संख्या अद्याप कमी

या माकडाची जेव्हा पहिल्यांदा ओळख पटविण्यात आली होती, तेव्हा त्याची संख्या सुमारे 260 ते 330 पर्यत असण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला होता. नंतर चीनमध्ये याचे आणखी काही समूह मिळाले. आययूसीएनच्या आकलनानुसार आता सुमारे 350 ते 400 प्रौढ माकडं असल्याचा अनुमान आहे. याची संख्या कमी असण्याचे मोठे कारण जंगल नष्ट होणे आणि शिकार आहे. जंगलांमध्ये रस्ते आणि इतर निर्माण घडामोडी वाढल्याने मानवी वावर वाढला आहे. यामुळै या माकडांवर शिकारीचा धोका वाढत असतो.

क्रिटिकली एंडेंजर्ड प्रजाती

म्यानमार स्नब-नोज्ड मंकीला आययूसीएनच्या रेड लिस्टमध्ये क्रिटिकल एंडेजर्ड ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ ही प्रजाती विलुप्त होण्याचा धोका अधिक आहे. फॉना अँड फ्लोरानुसार या माकडाला वाचविण्यासाठी जंगलांमध्ये कॅमरा ट्रॅप लावले जात आहेत. स्थानिक लोकांसोबत मिळून याच्या संरक्षणावर काम केले जात आहे.

2020 मध्ये माउंड इमाबुब नॅशनल पार्क निर्माण झाल्याने याचा अधिवास असलेल्या जंगलांच्या सुरक्षेत मदत मिळाली आहे. पावसात शिंकण्याच्या स्वत:च्या वैशिष्ट्यामुळे हे माकड अत्यंत वेगळे दिसते. परंतु याच्या समोर सर्वात मोठा धोका पाऊस नाही, तर जंगल कमी होणे आणि शिकार आहे. याच्या जंगलांना वाचविणे हीच या दुर्लभ माकडाला वाचविण्याची सर्वात आवश्यक पद्धत आहे.

Advertisement
Tags :

.