For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुद्धिबळातील जागतिक वर्चस्वात बदलाचे द्योतक

06:05 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बुद्धिबळातील जागतिक वर्चस्वात बदलाचे द्योतक
Advertisement

. गुकेशच्या विजेतेपदानंतर गॅरी कास्पारोव्हची प्रतिक्रिया : टॉरंटोमधील हा भारतीय भूकंप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ग्रँडमास्टर डी. गुकेशने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावून जागतिक विजेतेपदाचा सर्वांत तऊण आव्हानवीर बनल्याबद्दल रशियाचा दिग्गज बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हने त्याचे कौतुक केले आहे. हा टॉरंटोमधील भारतीय भूकंप आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा विजय खेळाच्या जागतिक वर्चस्वातील बदलाचे द्योतक आहे, असेही मत त्याने व्यक्त केले आहे.

Advertisement

 

17 वर्षीय गुकेशने 40 वर्षांपूर्वी कास्पारोव्हने बनवलेला विक्रम मोडीत काढला. त्यावेळी हा रशियन खेळाडू 22 वर्षांचा होता आणि तो 1984 मध्ये देशबांधव अनातोली कार्पोव्हला टक्कर देण्यास पात्र ठरला हाता. कास्पारोव्ह त्यावेळचा सर्वांत तऊण आव्हानवीर बनला होता. ‘अभिनंदन ! टॉरंटोमधील भारतीय भूकंप हा बुद्धिबळ विश्वातील बदलत्या वर्चस्वाचा कळस आहे. कारण 17 वर्षीय गुकेशला जगज्जेते बनण्यासाठी चिनी विजेता डिंग लिरेनचा सामना करावा लागेल’, असे कास्पारोव्हने ‘एक्स’वर नमूद केले भूतकाळातील रशियन बुद्धिबळपटूंच्या वर्चस्वाकडे त्याने अंगुलीनिर्देश केला आहे.

गुकेशने कँडिडेट्स स्पर्धेच्या 14 व्या आणि शेवटच्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत सहज बरोबरी साधली आणि जागतिक विजेत्याचा आव्हानवीर निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा नऊ गुणांसह पूर्ण केली. या विजयामुळे गुकेशचा वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत विद्यमान विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन याच्याशी सामना होईल.

कास्पारोव्हने विश्वनाथन आनंदचे भारतीय बुद्धिबळातील योगदानही मान्य करताना विशी आनंदची ‘मुले’ सुसाट सुटली आहेत, असे म्हटले आहे. दुसऱ्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये कास्पारोव्हने बुद्धिबळातील शक्तिस्थळे कशी बदलत आहेत त्यावर बदलावर प्रकाश टाकला आहे. ‘अमेरिका आणि इंग्लंडमधील अनेक आघाडीच्या कनिष्ठ खेळाडूंची नावे पाहा. चिनी आणि भारतीय बुद्धिबळात यश मिळविण्यासाठी किती उत्सुक आहेत ते त्यावरून कळेल’, असे त्याने म्हटले आाहे.

Advertisement
Tags :

.