For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरवडेच्या वासुदेव वैजची वैभववाडी श्री. किताबावर मोहोर

11:48 AM Jan 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
निरवडेच्या वासुदेव वैजची वैभववाडी श्री  किताबावर मोहोर
Advertisement

सिंधुदुर्गातून कौतुकाचा वर्षांव

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने वैभववाडी येथील यंगरस्टार मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंसाठी भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या चुरशीच्या स्पर्धेत निरवडे येथील वासुदेव वैज याने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर वैभववाडी श्री या किताबावर आपले नाव कोरत स्पर्धेचा मुख्य मानकरी ठरला.ही स्पर्धा नुकतीच वैभवाडी बाजारपेठ येथील नगरपंचायत कार्यालयासमोर असलेल्या भव्य मैदानावर पार पडली.या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शरीरसौष्ठवप्रेमी,प्रशिक्षक आणि क्रिडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती.वैभववाडी श्री ठरलेल्या वासुदेव वैज याला तीस हजार रुपये रोख,आकर्षक ट्रॉफी,मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.मात्र वासुदेवने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.निरवडे गावातील एका उमद्या खेळाडूने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने निरवडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यातून वासुदेव वैज याच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.