For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

women killed herself पुलावरून उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या, रत्नागिरीतील सोमेश्वर येथील घटना

03:13 PM Jun 14, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
women killed herself पुलावरून उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या  रत्नागिरीतील सोमेश्वर येथील घटना
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर येथे ३८ वर्षीय विवाहितेने पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. रमिजा इफ्तिकार हुश्ये (सोमेश्वर, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमिजा हुश्ये ही महिला सकाळपासून बेपत्ता होती. ती घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतर सकाळीच यासंदर्भात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू असतानाच, सोमेश्वर येथील पुलावर महिलेची ओढणी आणि चप्पल आढळली. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

Advertisement

याबाबत माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. काही वेळानंतर महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे सोमेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.