For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वर्ल्डकपआधीच विंडीजला धक्का

06:28 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
वर्ल्डकपआधीच विंडीजला धक्का
Advertisement

दुखापतीमुळे जेसन होल्डर स्पर्धेबाहेर

Advertisement

वृत्तसंस्था / पोर्ट ऑफ स्पेन

आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी राहिला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये यंदाचा टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. स्पर्धेआधी यजमान वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा माजी कर्णधार जेसन होल्डर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला असल्याची माहिती विंडीज क्रिकेट मंडळाने दिली. कौंटी क्रिकेट दरम्यान होल्डरला दुखापत झाली होती. यानंतर तो दुखापतीतून सावरला देखील होता पण विंडीज व द.आफ्रिका यांच्यात नुकत्याच झालेल्या मालिकेत त्याची दुखापत पुन्हा बळवाली. सध्या डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दुखापत बरी होण्यास बराच कालावधी लागणार असल्याने होल्डरने आपण विश्वचषक स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगितले. होल्डरच्या जागी संघात ओबेद मॅकॉयला स्थान देण्यात आल्याचे विंडीज मंडळाकडून सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.