For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर प्रदेशमध्ये शार्पशुटरची हत्या

06:42 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्तर प्रदेशमध्ये शार्पशुटरची हत्या
Advertisement

महेंद्र गौतम हत्येतील आरोपी

Advertisement

► वाराणसी

सारनाथ येथील महेंद्र गौतम यांची हत्या करणाऱ्या एक लाखाचे बक्षीस असणाऱ्या शार्प शुटर बनारसी यादव याची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री एसटीएफने चौबेपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही कारवाई केली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी जवळपास 106 दिवसांनंतर सदरच्या शार्प शुटरची हत्या केली आहे. घटनास्थळी दोन पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणामध्ये काडतुसे जप्त करण्यात आली आहे. बनारसी यादव हा गाझीपूरमधील करंडा येथील निवासी होता. वाराणसी, गाझीपूर, सोनबद्र यासह इतर ठिकाणी 24 हून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल होते. 21 ऑगस्ट रोजी सिंहपूर येथे बाईक चालकासह तिघांची गोळी झाडून त्याने हत्या केली होती. त्यानंतर पोलीस आणि एसटीएफ यांचे पथक त्याचा शोध घेत होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.