आईनस्टाइन अन् हॉकिंग्सपेक्षा कुशाग्र बुद्धी
11 वर्षीय केविनची होतेय जगभरात चर्चा
ब्रिटनमधील 11 वर्षीय मुलगा केविन स्वीनी स्वतःच्या कुशाग्र बुद्धीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. केविनने एडिनबर्गमध्ये क्वेकर मीटिंग हाउसमध्ये आयक्यू टेस्ट दिली होती. या टेस्टमध्ये त्याने 162 गुण प्राप्त केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे इतका अधिक आयक्यू जगात केवळ एक टक्के लोकांचाच असतो. भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांचा आयक्यू स्कोर 160 होता. तर आइनस्टाइन यांचा आयक्यू देखील इतकाच होता असे मानले जाते.
आयक्यू टेस्टमध्ये सामील झालेल्यांमध्ये केविन सर्वात कमी वयाचा मुलगा होता. या टेस्टच्या निष्कर्षांचा अनुमान आम्ही पूर्वीच व्यक्त केला होता असे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. केविनने वयाच्या 6 व्या वर्षीच अनेक अवघड गणितांची उत्तरं शोधून काढली होती.
या मुलाला ऑटिजमचा आजार आहे. तो 6 वर्षांचा होता, तेव्हाच त्याने पूर्ण पीरियॉडिक टेबल तोंडपाठ केले होते. प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वीच त्याने शिक्षणास प्रारंभ केला होता. एडिनबर्गच्या क्वैक मीटिंग हाउसकडून आयोजित आयक्यू टेस्टमध्ये सामील होण्याची संधी मिळालेला केविन हा एकमात्र लहान मुलगा होता. आइनस्टाइन किंवा हॉकिंग यांनी कधीच ही टेस्ट दिली नव्हती. परंतु त्यांचा आयक्यू केविनपेक्षा कमी मानला जतो.
आईवडिल यशामुळे आनंदी
मुलाच्या आईवडिलांना त्याच्या ज्ञानाबद्दल गर्व आहे. मुलाला त्याचा निकाल सांगितल्यावर तो प्रचंड आनंदी झाल्याचे त्यांनी सांगितले. केविनच्या जीवनात अनेक आव्हाने आहेत, याचमुळे या यशामुळे त्याचा आत्मविश्वास वाढणार अशी अपेक्षा आमही करत आहोत. या टेस्टमध्ये याच्या वयाचे कुणीच सामील झाले नव्हते. सर्वजण वयाने खूपच मोठे होते, तरीही केविनने सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत. माझा मुलगा जीनियस असल्याचे आम्ही पूर्वीपासूनच जाणून आहोत असे त्याच्या आईने म्हटले आहे.