इंटरआर्क बिल्डिंगचा समभाग सुचिबद्ध
आयपीओ 93 पट सबस्क्राइब : 600 कोटींची उभारणी
वृत्तसंस्था/ मुंबई
इंटरआर्क बिल्डिंग प्रोडक्टस यांचा आयपीओ सोमवारी शेअर बाजारामध्ये दमदारपणे लिस्ट झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईवर 44 टक्के प्रीमियमसह 1299 रुपये प्रति समभाग याप्रमाणे लिस्ट झाला असून बीएसईवर हा समभाग 43 टक्के प्रीमियमसह 1291 रुपयांवर लिस्ट झाला होता.
कंपनीने आयपीओची इशू किंमत 900 रुपये इतकी ठेवली होती. तज्ञांनी सदरचा समभाग 1260 ते 1280 प्रतिसमभाग याप्रमाणे बाजारात खुला होऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता. इंटरआर्कच्या इशूला शेवटच्या दिवशी 93 पट सबक्रीप्शन मिळाले आहे. आयपीओ पहिल्या दिवशीच पूर्णपणे सबक्राईब झाला होता. आयपीओ 19 ऑगस्ट रोजी सबक्रिप्शनसाठी खुला झाला होता आणि 21 ऑगस्ट रोजी बंद झाला. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून आतापर्यंत 600 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. 22 लाख नव्या समभागांच्या माध्यमातून 200 कोटी रुपये उभारण्यात आले असून 44 लाख समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीत करत 400 कोटी रुपये उभारण्यात आले आहेत.