For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हादरलेल्या दिल्लीचा बलाढ्या ‘आरसीबी’शी मुकाबला

06:50 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
हादरलेल्या दिल्लीचा बलाढ्या ‘आरसीबी’शी मुकाबला
Advertisement

पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या पराभवातून सावरण्याचे दिल्ली कॅपिटल्सपुढे आव्हान

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

दिल्ली : 264 धावा करूनही झालेल्या मोठ्या पराभवामुळे दुखावलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडे भावनिकरीत्या सावरण्यासाठी फारच कमी वेळ आहे, कारण आज सोमवारी येथे त्यांचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या आणखी एका बलाढ्या संघाशी होणार आहे. पंजाब किंग्सकडून सहा गडी राखून झालेल्या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ हादरला आहे. या सामन्यात विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांच्या गोलंदाजांची धुलाई झाली.

गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असलेला हा संघ आता प्लेऑफच्या चुरशीच्या शर्यतीत अडकला आहे, जिथे आणखी एक पराभव त्यांच्या संधींना गंभीर धक्का देऊ शकतो. दिल्लीची आतापर्यंतची मोहीम शानदार फलंदाजीने गाजली आहे, परंतु गोलंदाजीतील कामगिरी मात्र सातत्यपूर्ण राहिलेली नाही. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील त्यांच्या आघाडीच्या फळीने वारंवार धडाकेबाज सुऊवात करून दिली आहे, तर नितीश राणा आणि डेव्हिड मिलरसारख्यांनी मधल्या षटकांमध्येही ही गती कायम राखली आहे. मात्र, धावसंख्येचा पाठलाग करताना मिळालेल्या माफक यशानंतर मोठ्या धावसंख्येचाही बचाव करण्यात आलेले अपयश ही चिंतेची बाब आहे.

विशेषत: अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी दबावाखाली कमकुवत दिसत आहे आणि हीच गोष्ट विरोधी संघांनी लक्ष्य करायला सुऊवात केली आहे. जर दिल्लीला अलीकडच्या सामन्यांमध्ये महागात पडलेल्या त्रुटी दूर करायच्या असतील, तर वेगवान गोलंदाज आकिब नबी, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि कर्णधार अक्षर पटेल यांना, विशेषत: निर्णायक क्षणी, लक्षणीय कामगिरी करावी लागेल.

याउलट गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने सर्व विभागांमध्ये अधिक संतुलन दाखवले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील त्यांची फलंदाजीची फळी अव्वल फळीतील फलंदाजांच्या भक्कम योगदानावर अवलंबून राहिली आहे आणि देवदत्त पडिक्कल फॉर्ममध्ये परतल्याने संघाला आणखी खोली आणि स्थिरता मिळाली आहे. मधल्या फळीनेही सामने जिंकून देण्यात अधिक निश्चित भूमिका बजावली आहे.

पण आरसीबीचा धोका केवळ त्यांच्या फलंदाजीच्या ताकदीपुरता मर्यादित नाही. त्यांच्या गोलंदाजांनी महत्त्वाच्या टप्प्यांवर, विशेषत: अखेरच्या षटकांमध्ये, विरोधी संघांना नियंत्रणात ठेवण्याची क्षमता दाखवली आहे. हा एक असा गुण आहे जो धावांचा पाऊस पाडणाऱ्या दिल्ली संघाविऊद्ध निर्णायक ठरू शकतो.

संघ : दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल (कर्णधार), पथुम निसांका, के. एल. राहुल, नितीश राणा, समीर रिझवी, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, कुलदीप यादव, मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, टीम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा आणि जेकब डफी.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.