For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सातवीच्या विद्यार्थ्यानं दिली वर्ग मैत्रिणीची सुपारी

01:29 PM Jan 30, 2025 IST | Pooja Marathe
सातवीच्या विद्यार्थ्यानं दिली वर्ग मैत्रिणीची सुपारी
Advertisement

कारण आहे खूपच धक्कादायक
'अत्याचार करुन हत्या करा' अशी दिली सुपारी
दौंड
सातवीच्या वर्गातल्याविद्यार्थ्याने वर्गमैत्रिणीची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित विद्यार्थ्याने प्रगती पुस्तकावर पालकाची खोटी सही केली. वडिलांची खोटी सही केल्याचे संबंधित विद्यार्थिनीने शिक्षकांना सांगतिले. या प्रकाराचा राग आल्याने विद्यार्थ्यांने मुलीच्या खुनाची चक्क सुपारी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे.
सुपारी देऊन हत्त्या घडवणे यांसारख्या गोष्टी सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचत आहेत. वाढत्या गुन्हेगारीचा बालमनावर विपरित परिणाम झाल्याचे या धक्कादायक घटनेनंतर समोर येत आले. ही घटना शहारातील एका प्रतिष्ठीत शाळेत घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जाते. पण ही मुलं काय करतात, काय विचार करतात. कोणाशी बोलतात यावर लक्ष ठेवण्याची वेळ आली असल्याचे दिसत आहे. शाळकरी मुलांपर्यत सुपारीचं लोणं पोहचल्याने पालकांनी या संदर्भात अधिक जागरुक राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.