For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपघातांची मालिका !

06:23 AM Jun 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
अपघातांची मालिका
Advertisement

आजच्या धकाधकीच्या जीवनात घात आणि अपघात या संकल्पना अधिकच चर्चेत येत आहेत. माणसाने विज्ञान, तंत्रज्ञान यामध्ये प्रगती केली असली तरी माणसातील संवेदना, संयम आणि माणुसकी हरवत चालली आहे. त्यामुळे अनेकदा काही गोष्टी नैसर्गिक किंवा अपघाताने घडतात, तर काही वेळा हेतुपुरस्सर घडवून आणल्या जातात यालाच आपण ‘घात’ असे म्हणतो. तर ‘अपघात’ हा अनपेक्षितरित्या घडलेला अपघात असतो. सध्या याच अपघातांची मालिका देशभरात सुऊ असून, त्यावर योग्य उपाय योजण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

मुंबईनजीक ठाणे येथील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेला रेल्वे अपघात असो की गुजरातमधील न भुतो, न भविष्यती अशी झालेली विमान दुर्घटना असो की पुणे जिह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेला अपघात असो. या महिन्याच्या सुऊवातीपासूनच मुंबईसह राज्यात तसेच देशात अपघातांची मालिकाच सुऊ झाली आहे. यामध्ये दोष कोणाचा आहे नेमके हे अपघात आहेत की घात आहेत, याची शंका सर्वसामान्यांच्या मनाला शिवणे साहजिकच आहे. मात्र या सर्व अपघातांच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. कारण यामध्ये बळी गेला आहे तो निरपराध्यांचा.

अहमदाबादमध्ये 12 जून रोजी दुपारी एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. एअर इंडियाचे हे विमान एआय 171 लंडनच्यागॅटविकला जात होते. या विमानात 242 प्रवासी, 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. त्यापैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 व्यक्ती कॅनेडियन होती, तर 7 पोर्तुगालचे नागरिक होते. धावपट्टीवरून उ•ाण केल्यानंतर लगेचच विमान अवघ्या 50 सेकंदात विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्या ठिकाणाहून धुराचे लोट दिसत होते. विमानाच्या रडार 24 नुसार, अपघातग्रस्त विमान 787-8 ड्रीमलायनर प्रकारचे होते.

Advertisement

या विमानाने अहमदाबादहून दुपारी 1.39 वाजता उ•ाण केले. त्यांनी एटीसीला डिस्ट्रेस कॉल केला, म्हणजे मे-डे चा मेसेज दिला. परंतु त्यानंतर एटीसी कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. धावपट्टी 23 वरून उ•ाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर पडले. या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती. तर दुर्देवाची बाब म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय ऊपाणी देखील प्रवास करीत होते. मात्र त्यांचा देखील करूण अंत झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचे काही एक कारण पुढे आले नाही. अपघाताचे अचुक कारण शोधणारा ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणेला मिळाला. मात्र तो ही व्यवस्थित नसल्याने, ब्लॅक बॉक्समधील माहिती गोळा करण्यासाठी तो परदेशात पाठवावा लागणार आहे. तर या विमान अपघातात ब्रिटीश नागरिक अधिक असल्याने, त्यांनी देखील तपासात रस घेतला आहे. दुसरीकडे या विमान अपघाताचे कारण पुढे यायला कमीत कमी एक वर्ष तरी लागणार. देशात अशा प्रकारचा विमान अपघात कधीच झाला नव्हता. यामुळे या अपघातामागील कारणांचा शोध घेण्यास तपास यंत्रणांना वेळ तर लागणारच.

राज्यात पावसाने अनेक ठिकाणी अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. त्यातच पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चौघांचा मफत्यू झाला असून, 51 जण जखमी झाले आहेत. कुंडमळा हे या परिसरातील एक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते. त्यात 15 जून असल्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी होती. या ठिकाणी 100-150 पर्यटक वर्षाविहारासाठी आले असताना इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला आणि त्याखाली काही पर्यटक अडकले. हा पूल 30 वर्षे जुना होता. पुलाची दुऊस्ती करण्याची सातत्याने मागणी सुऊ होती. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या निरपराध्यांना आपला जीव गमावावा लागला. कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. तर अनेकदा काही ठिकाणी अपघातांची मालिका सुऊ असतानाही याठिकाणी जाग येऊन देखील झोपेचे सोंग घेतले जाते. ते म्हणजे रेल्वे अपघाताबाबत.

मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या रेल्वे लाईनवर अपघातांची मालिका दर दिवसाला सुऊ असते. रोज मरे त्याला कोण रडे असे सध्या रेल्वे अपघाताबाबत बोलले जात आहे. अशातच 9 जून रोजी कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कसाऱ्याकडे निघालेल्या दोन लोकलमधील 4 प्रवाशांचा फूटबोर्डवरून खाली पडून मुंब्रा येथे दुर्दैवी अंत झाला. मफतांमध्ये एका रेल्वे पोलिसाचाही समावेश आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 8 ते 10 प्रवाशांचा रोज बळी जातो. त्यात एक तरी महिला असते. दरवर्षी मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या तीन ते साडेतीन हजार प्रवाशांचा बळी जातो.

या दुर्घटनेबाबत रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या गर्दीकडे बोट दाखवीत असले तरी ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथील रेल्वे मार्गिकेचे ‘धोकादायक वळण’ (रेल्वेच्या भाषेत ‘ब्लॅक स्पॉट’) प्रवाशांसाठी कधीतरी जीवघेणे ठरणारच होते. या दुर्घटनेने लोकल प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे प्रशासनाचा ढिम्मपणा पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे. रेल्वेची ही बेपर्वाई गेली अनेक वर्षे प्रवाशांच्या जिवावर उठत आहे. 29 सप्टेंबर 2017 रोजी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला त्यावेळच्या एल्फिन्स्टनच्या पुलावरील जिन्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचे बळी गेले. हे हत्याकांड कधीतरी होणारच होते. मुंबईतील रेल्वे लोकलमधून रोज लाखो प्रवासी किड्यामुंग्यांसारखे चढत-उतरत असतात. जीव मुठीत घेऊन लोंबकळत असतात. त्यातून कधी कुणाचा हात सटकून धावत्या गाडीतून तो खाली पडतो, तर कधी कुणी फलाटावर पडून रेल्वे ऊळाखाली येतो. असे रोज सरासरी 8 ते 10 रेल्वे प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करताना वेगवेगळ्या कारणांमुळे मफत्युमुखी पडत आहेत.

मुंबईवर रोज आदळणारे लोंढे, त्यामुळे सामान्य प्रवाशांचा मूळ मुंबईकरांचा आज श्वास कोंडला आहे. मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणे त्याला असुरक्षित वाटत आहे. कधी तुमचा खिसा कापला जाईल, तुमच्या हातातील मोबाईल,

बॅग हिसकावली जाईल हे सांगता येणार नाही. रेल्वेच्या ‘आरपीएफ’मध्ये जितका भ्रष्टाचार आहे तितका कुठेही नाही. तेथे महत्त्वाच्या पोस्टिंग मिळविण्यासाठी लाखो ऊपये मोजले जातात. मागे एका माजी रेल्वेमंत्र्याचा भाचा विजय सिंगला यास 90 लाखांची लाच घेताना सीबीआयने अटक केली होती.

आज रेल्वेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्यामुळेच रेल्वेत आज भयानक गुन्हेगारी वाढली आहे. रेल्वे ऊळावर लोखंडी रॉड ठेवून घातपात घडविले जात आहेत. मुंबईच्या लोकल अपघातात दरवर्षी अनेक जण प्राण गमावत असतात. त्यामुळे बऱ्याच जणांची मुले पोरकी व निराधार होत असतात. यामुळे रेल्वे अपघाताच तर नाही तर रस्ते, हवाई अपघातांची मालिका थांबविण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ आहे.

-अमोल राऊत

Advertisement
Tags :

.