For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मासूम“चा सीक्वेल येतोय

06:22 AM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मासूम“चा सीक्वेल येतोय
Advertisement

संगीतकार एआर रहमान यांचे निर्मितीत योगदान

Advertisement

फिल्ममेकर शेखर कपूर लवकरच स्वत:चा चित्रपट ‘मासूम“चा सीक्वेल ‘मासूद द न्यू जनरेशन“ घेऊन येणार आहेत. यात प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमानसोबत ते काम करणार आहेत. 1983 मध्ये प्रदर्शित क्लासिक चित्रपट ‘मासूम“ पुन्हा नव्या शैलीत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

रहमान यांच्यासोबत मिळून शेखर हा चित्रपट निर्माण करणार आहेत. चालू वर्षातच याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. याकरता कलाकारांची नावे ठरली आहेत. तसेच पटकथाही तयार असून ती ऐकल्यावर ए.आर. रहमान यांनी सहनिर्माता होण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला होता असे शेखर यांनी सांगितले आहे.

Advertisement

मासूम चित्रपटाची कहाणी आजच्या काळात दाखविणे आवश्यक असल्याचे मला दीर्घकाळापासून वाटत होते. परिवार, नातेसंबंध हे सर्व समाजात अत्यंत विकसित झाले आहेत. त्याचप्रकारे या सर्वांना चित्रपटात देखील दाखविणे आवश्यक आहे. नव्या चित्रपटाचे एक गाणे रिकॉर्ड करण्यात आल्याचे शेखर कपूर यांनी सांगितले.

मासूम चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कपूर यांनी 1983 मध्ये केले होते. या चित्रपटात शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह, तनुजा, सुप्रिया पाठक आणि सईद जाफरी होते. हा चित्रपट अमेरिकन लेखक एरिक सेगल यांचे पुस्तक ‘मॅन, वुमन अँड चाइल्ड‘वर आधारित होता. मासूम चित्रपटाची कहाणी एका आनंदी दांपत्यावर आधारित होती, ज्यांचे जीवन उतारचढावांना सामोरे जाते.

Advertisement
Tags :

.