खोसला का घोसलाचा सीक्वेल येतोय
कल्ट क्लासिक खोसला का घोसला या चित्रपटाचा सीक्वेल निर्माण करण्यात आला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन ऑगस्ट महिन्यात होणार होते, परंतु काही कारणांमुळे त्याचे प्रदर्शन लांबवणीवर ढकलण्यात आले होते. आता अखेर खोसला का घोसला 2 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
निर्मात्यांनी याचे पोस्टर जारी केली असून यात सर्व कलाकार दिसून येत आहेत. हे पोस्टर मूळ चित्रपटाच्या अनोख्या शैलीची आठवण करून देणारे आहे. पोस्टरमध्ये अनुपम खेर, बोमन ईराणी, रणवीर शौरी, प्रवीण डबास, तारा शर्मा आणि किरण जुनेजा पुन्हा दिसून येतात. त्यांच्यासोबत रवि किशन, दिव्या खोसला, निशांत वर्मा, कंगन बरुआ नांगिया आणि दानिश इक्बाल यासारखे नवे चेहरे देखील सामील आहेत.
खोसला का घोसला 2 हा चित्रपट 5 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रिया मिश्रा आणि प्रशांत भागिया यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार करत आहेत.
2006 साली प्रदर्शित खोसला का घोसला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नव्हता. परंतु नंतर चित्रपटाला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला होता. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर बॅनर्जीने केले होते. आता 20 वर्षांनी पुन्हा एकदा खोसला परिवार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परतणार आहे.
