‘फाइव्ह नाइट्स एट फ्रेडीज 2’ चा सीक्वेल येणार
‘फाइव्ह नाइट्स एट फ्रेडीज 2’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. याच्या टीझरवरून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एम्मा टॅनी यांनी केले असून त्यांनीच स्कॉट कॉथॉन आणि सेठ कुडेबॅक यांच्यासोबत मिळून याची कहाणी लिहिली आहे. या चित्रपटात जोश हचर्सन, मॅथ्यू लिलार्ड, पाइपर रुबियो आणि एलिझाबेथ लेल यासारखे कलाकार पुन्हा दिसून येणार आहेत. कहाणीत माइकला भीतीदायक एनिमेट्रॉनिक्स सारख्या फ्रेडी, बोनी, फॉक्सी, चिका आणि कार्ल द कपकेपचा सामना करावा लागेल. हा चित्रपट 2014 च्या लोकप्रिय व्हिडिओ गेमवर आधारित आहे. टीझरमध्ये वॅनेसा ही माइक याला ‘ते’ प्रत्येक ठिकाणी आहेत असा इशारा देताना दिसून येते. पहिल्या चित्रपटात पिझ्झेरियामध्ये एक रहस्य दडलेले असल्याचे दाखविण्यात आले हेते सीक्वेलमध्ये हे रहस्य खुले होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.