मोती तलावाच्या काठावर महिनाभरात सेल्फी पॉईंट उभारणार
सावंतवाडी । प्रतिनिधी
दीपक केसरकर मित्रमंडळ आणि लोकसभागातून उभारला जाणार सेल्फी पॉईंट
सावंतवाडी शहरात श्रीराम वाचन मंदिर समोर दीपक केसरकर मित्र मंडळ आणि लोकसभागातून सेल्फी पॉईंट उभारण्याचे काम सुरू झाले आहे. आकर्षक रीतीने हा सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. सेल्फी पॉईंटच्या मध्यवर्ती ठिकाणी फळांचा सेट उभारण्यात येणार आहे. हा सेल्फी पॉइंट नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत होता. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यकाळात या सेल्फी पॉइंटसाठी जिल्हा नियोजन मंडळातून तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी आठ लाख रुपये मंजूर केले होते. त्या निधीतून सेल्फी पॉइंटचे काम सुरू झाले होते . चिऱ्याचे बांधकामही करण्यात आले होते. परंतु, गेली दोन वर्षे हे काम थांबले होते. त्यामुळे सेल्फी पॉईंट होणार की नाही यासंदर्भात नागरिकात संभ्रमावस्था होती. पूर्वीच्या सेल्फी पॉईंट बाबत शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनीही आक्षेप घेतला होता. परंतु आता दीपक केसरकर मित्र मंडळाच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून या सेल्फी पॉईंट चे काम सुरू झाले आहे . महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. या संदर्भात मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दीपक केसरकर मित्र मंडळ आणि लोकसभागातून हा सेल्फी पॉईंट उभारण्यात येत आहे तो पालिकेकडे असणार आहे असे स्पष्ट केले.