Ambabai Temple | अंबाबाईच्या दर्शनासाठी जनसागर; ४ दिवसांत तब्बल ३ लाख १० हजार भाविकांनी घेतले दर्शन
Ambabai Temple | ईद-ए-मिलाद सणापासून मिळालेल्या चार सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी अंबाबाईचे दर्शन व पर्यटन असे नियोजन करुन महाराष्ट्रासह कर्नाटक व गोबा येथील हजारोंच्या संख्येने भाविक कोल्हापुरात आले होते. या सर्वांचे क्षणाक्षणाला आगमन होत राहिल्याने करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा परिसरात गर्दीने फुलून गेला. पहाटेपासून मंदिराच्या दर्शन मंडपात भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे दर्शन मंडप हाऊसफुल्ल झाला होता.
अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर तातडीने भाविक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांकडे रवाना होत राहिले. त्यामुळे कोल्हापूरच्या दाहीदिशांच्या रस्त्यांवर भाविकांची मोठ्या संख्येने बाहने दिसत होती. गेल्या चार दिवसांच्या कालावधीत ३ लाख १० हजार भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद मंदिरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे झालीआहे. दरम्यान, गेल्या बुधवारी साजरा झालेल्या ईद-ए-मिलाद या सणापासून महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील हजारो भाविकांचे कोल्हापुरात आगमन सुरु होते. यात पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, मुंबई, ठाणे, कोकण, सोलापूर, वाशिम, अंबाजोगाई, पेनवेल, बेळगाव येथील भाविकांची संख्या अधिक होती, असे वाहनतळांवर लावलेल्या वाहनांवरुन स्पष्ट झाले. पर्यटक व भाविकांनी पहाटेपासून अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळील दर्शन मंडपातदाखल व्हायला सुरुवात केली होती.
गेल्या चार दिवसांच्या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत मंडपातील भाविकांनी दर्शन मंडप अक्षरशः फुलून जात होता. मंडपातील भाविकांची रांग नजिकच्या शेतकरी संघ कार्यालयापर्यंत जाऊन थडकत होती.दुसरीकडे सतत भाविकांनी हाऊसफुल्ल राहिलेला दर्शन मंडप पाहून बाहेरच्या भाविकांनी पश्चिम, दक्षिण व उत्तर दरवाजातून मंदिराच्या अंतरंगातील गणपती चौकातून अंबाबाईचे दर्शन घेतले. चौकातून दर्शन घेण्यासाठी प्रत्येक ५ मिनिटाला शेकडो भाविक एकत्र येत होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर बहुसंख्य भाविकांनी मंदिराला प्रदक्षिणा घालत अंबा माता की जयचा गजर केला.
सलग सुट्यांमुळे परजिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने मंगळवारी रात्रीपासून मोठमोठ्या वाहनांनी कोल्हापुरात येत होते. त्यांच्या बाहनांनी बिंदू चौक, दसरा चौकासह वाहनतळासह सरसस्वी चित्रमंदिराजवळील मल्टी पार्किंग इमारतही भरुन जात राहिली. तसेच करवीरनगर वाचन मंदिराच्या पिछाडीस, छत्रपती शाहू स्टेडियम व गुरु महाराज बाडा, बिनखांबी गणेश मंदिर या भागातील खासगी वाहनतळेही वाहनांनी भरली भरली. अशा परिस्थिती ज्या भाविकांना वाहनतळांबर जागा मिळाली नाही, त्यांना मिरजकर तिकटी, छत्रपती शाहू स्टेडियम, रंकाळा तलाब, ताराबाई रोड, शहाजी कॉलेज रोड,गांधी मैदान, दैवज्ञ बोर्डोंग, न्यू महाद्वार रोड आदी भागात वाहने पार्किंग करावी लागली.