महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माघी पौर्णिमेनिमित्त यल्लम्मा डोंगरावर लोटला भाविकांचा जनसागर

06:35 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सहा लाखाहून अधिक भाविकांनी घेतले देवीचे दर्शन

Advertisement

भरत कडोलकर  / बाळेकुंद्री

Advertisement

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवीचे दर्शन शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसात   सुमारे सात लाखाहून अधिक भाविकांनी घेतले. यल्लम्मा देवाच्या डोंगरावर कर्नाटकासह महाराष्ट्रातील भाविकांची उपस्थिती आवर्जून दिसत होती. भगवे झेंडे लावलेल्या वाहनांच्या रांगा डोंगरावर दिसत होत्या. त्यामुळे डेंगर परिसर भगवेमय दिसत होता.

उदो गं आई उदो च्या गजरात, ढोल ताशांच्या तालात व भंडाऱ्याच्या उधळणीत  यल्लम्मा डोंगर परिसर अक्षरश: दुमदुमून गेला होता. शुक्रवारी माघ पौर्णिमेच्या दिवशी तर सौंदत्तीच्या डोंगरावर चार लाखांहून अधिक भाविकांचा जनसागर लोटला होता. पहाटेपासून बस, कार, टमटम, टॅक्टर, मोटारसायकलींसह देवीच्या दर्शनाला निघालेला जनसागर पहावयास मिळला. भाविकांना देवीच्या दर्शनासाठी तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागले.

 दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा

महाराष्ट्रासह बेळगाव, विजापूर, धारवाड, बागलकोट, गोवा, धारवाड, विजापूर व गुलबर्गा तालुक्यातील लाखो भाविक दाखल झाल्याने डोंगर गर्दीने फुलून गेला होता. पहाटे हुली गावचे शिवशंकर स्वामी यांच्या उपस्थितीत देवीचे विधिवत पूजन झाले. पहाटेपासूनच देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगुळभावी पुंडात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली होती. देवीच्या दर्शनानंतर मंदिरापासून 3 कि. मी. अंतरावर असलेल्या पारसगड येथील रामलिंग देवस्थान, श्रीमौनेश्वर व परशुराम मंदिरातही दर्शनसाठी गर्दी झाली होती.

पडल्या भरण्याचा कार्यक्रम उत्साहात

माघ पौर्णिमेच्या दिवशी पडल्या भरण्याचा कार्यक्रम झाला. या दिवशी कडबाच्या पोळ्या, पुरण पोळ्या, वांग्याची भाजी, भात, तूप या पदार्थांचा नैवेद्य भाविकांनी देवीला समर्पित केला. तसेच नव्याने घेतलेल्या पडल्या व कवड्यांची पूजा करून पडल्या भरण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

पारसगडावरही भाविकांची गर्दी

देवीच्या दर्शनानंतर सौंदत्तीजवळ असलेल्या पारसगडावरही भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरापासून तीन कि.मी अंतरावर पारसगड आहे. तेथे जागृत रामलिंगेश्वर मंदिर आहे. हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

 वाहतूक विस्कळीत

डोंगरावर गेल्या दोन दिवसांपासून विविध भागातून आलेल्या चारशेहून अधिक  विविध राज्य परिवहन बसेस मिळेल त्याठिकाणी उभ्या केल्याने डोंगरावर वाहतूक विस्कळीत झाली. डोंगरावर सपंर्कात असलेले उगरगोळ सौंदत्ती मार्गावर राज्य परिवहन सस्थेच्या बसेस थांबल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची कोडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे फिरनेही मुष्कील झाले होते. पोलीस व वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी ठिकठिकाणी उडाल्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article