कंदीलासारखा दिसणारा सागरी जीव
इंद्रधनुष्यासारखे रंग पाहून संशोधक थक्क
खोल समुद्रात राहणाऱ्या जीवांचे रहस्यमय जग नेहमीच लोकांना आकर्षित करत असते. सोशल मीडियावर सध्या एक असाच थक्क करून सोडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात खोल समुद्रात कंदीलासारखा दिसणारा एक जीव दिसून येतो. लाल रंगाच्या या जीवाच्या चहुबाजूला लायटिंगप्रमाणे चमक आहे.
इन्स्टाग्रामावर ‘मोंटेरी बे एक्वेरियम’ नावाच्या पेजवरून हा या जीवाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ब्लडी-बेली कॉम्ब जेलीचा लाल रंग आणि चमकदार प्रकाश मंत्रमुग्ध करणारा असल्याचे याच्या कॅप्शनदाखल म्हटले गेले आहे. या व्हिडिओचे श्रेय एक सागरी विज्ञान संशोधन केंद्र ‘मोंटेरे बे एक्वेरियम रिसर्च इन्स्टीट्यूटच्या’ संशोधकांना देण्यात आले आहे.
या व्हिडिओच्या प्रारंभी एक सुंदर लाल रंगाची ‘ब्लडी-बेली कॉम्ब जेली’ पाण्यात पोहताना दिसून येते. याच्या शरीरावर चमकदार इंद्रधनुष्यी प्रकाश देखील आहे. व्हिडिओत तज्ञ खोल समुद्रात राहणाऱ्या जीवांविषयी माहिती देत असल्याचे दिसून येते. खोल समुद्रातील हा सर्वात शांत जीव आहे, हा जीव स्वत:च्या गदड लाल रंगामुळे स्वत:ला समुद्रात लपवू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.
20 वर्षांपूर्वी झाला शोध
वैज्ञानिकांनी ‘ब्लडी-बेली कॉम्ब जेली’ या जीवाचा पहिल्यांदाच शोध लावलेला नाही. मोंटेरे बे एक्वेरियमनुसार 20 वर्षांपूर्वी सर्वप्रथम या जीवाचा शोध लावण्यात आला होता. तेव्हापासून यावर सातत्याने संशोधन केले जात आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तर पोस्टला सुमारे 7100 लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. लोक यावरून कॉमेंट देखील करत आहेत.