For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : कवलापूर येथे जाब विचारण्यास गेलेल्या सरपंच महिलेस शिवीगाळ

04:24 PM Jan 07, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   कवलापूर येथे जाब विचारण्यास गेलेल्या सरपंच महिलेस शिवीगाळ
Advertisement

                       कवलापूर सरपंच सुषमा पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला

Advertisement

सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे पतीकडून भाचीला मारहाण झाल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सरपंच महिलेसह इतरांना शिवीगाळ करून कोयता घेऊन अंगावर धावून आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित बाजीराव शिवाजी नलावडे (रा. नलावडे गल्ली, कवलापूर) याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,याप्रकरणी सुषमा शरद पाटील (सरपंच, कवलापूर) यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. सरपंच पाटील यांची भाची सानिका आणि या गुन्ह्यातील संशयित बाजीराव नलावडे हे पती पत्नी आहेत.बाजीराव हा पत्नी सानिका हिला सतत मारहाण करत असे. दोन दिवसांपूर्वीही त्याने अशीच मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी सरपंच पाटील, त्यांची बहीण संगीता बिले, भाचा रोहन बिले, मामा अमर पवार हे सोमवारी बाजीराव याच्या घरी गेले होते.

Advertisement

त्यावेळी संशयितबाजीराव यांनी सरपंच पाटील यांना तुमचा काय संबंध, असे अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली. त्यानंतर धावत घरात जाऊन वैरण तोडण्याचा कोयता घेऊन येऊन तो सरपंच पाटील यांच्या अंगावर धावून आला. असाच प्रकार त्याने सायंकाळीही केला, तो सरपंच पाटील यांचे पती शरद पाटील यांच्या अंगावरही कोयता घेऊन धावून गेला होता. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित बाजीराव नलावडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Tags :

.