आरशाप्रमाणे चमकणारे मिठाचे वाळवंट
सुंदर दृश्य अन् आकृत्यांसाठी प्रसिद्ध
बोलीवियाच्या सालार दे उयूनी सॉल्ट फ्लॅट्स अनोखे मिठाचे मैदान आहे. हे मिठाचे मैदान पाहून लोक जणू पाण्यावर चालत असल्याचे भास होतो. तर येथे पाणी केवळ काही इंच खोल आहे. दरवर्षी सरोवराच्या 11 हजार चौरस किलोमीटरच्या बहुतांश हिस्स्यात काही काळासाठी पूर येतो आणि एक स्वच्छ आरशाप्रमाणे पृष्ठभाग निर्माण होतो.
उयूनीचे वर्णन ‘जेथे पृथ्वी आकाशाला भेटते ते ठिकाण’ असे केले जाते. पावसाळ्यात सपाट पांढऱ्या भूमीवर जमा होणारे पाणी मिठाच्या वाळवंटाला पूर्णपणे प्रतिबिंबित करते. एक अंतहीन आरशाप्रमाणे हे प्रतिबिंध असते. याचमुळे तेथे भूमी कुठे संपते आणि आकाश कुठून सुरू होते हे ठरविणे अवघड ठरत असते.
एल सालार डी उयूनी स्वत:च्या अनोख्या हेग्जागोनल किंवा षट्कोनीय संरचनांसाठी ओळखले जाते. यात मैदानात मिठाचे पॅटर्न सामील आहे. सालार दे उयूनी सॉल्ट फ्लॅट्समध्ये पालासियो डे साल हे जगातील पहिले सॉल्ट हॉटेल असून ते डॉन जुआन क्वेसाडा वाल्डाचा एक महत्त्वाकांक्षी वास्तुशिल्प प्रकल्प आहे. मिठाच्या मैदानादरम्यान एक हॉटेल असून ते पूर्णपणे मिठाने तयार करण्यात आले आहे. हे हॉटेल 2002 साली बंद करण्यात आले होते.
परंतु मूळ इमारत अद्याप उभी आहे. पालासियो डी सालची नवी आवृत्ती 2004 साली उयूनीच्या महान मीठ समुद्राच्या किनाऱ्यावर सुरू करण्यात आली होती, जी या क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आणि उच्चस्तराच्या हॉटेल्सपैकी एक आहे.
40 हजार वर्षांपेक्षाही पूर्वी एक महान प्रागैतिहासिक सरोवर, मिनचिन सरोवर बोलिवियन अल्टीप्लोनाच्या क्षेत्रात होते, जेथे आता सालार दे उयूनी, सालार दे कोइपासा आणि लेक पूपो अस्तित्वात आहे. हे सरोवर अतिवृष्टी आणि आर्द्रतेमुळे निर्माण झाले होते, परंतु हवामान शुष्क होताच पाण्याचे बाष्पीभवन होत गेले आणि आताच्या अल्टीप्लानोमध्ये मीठाचे मैदान आणि आधुनिक मिठाची सरोवरे निर्माण झाली.
सालार दे उयूनी सॉल्ट फ्लॅट्समध्ये 10 अब्ज टनापेक्षा अधिक मीठ असल्याचा अनुमान आहे. यातून कोलचानी कोऑपरेटिव्ह दरवर्षी सुमारे 25 हजार टन मीठ प्राप्त करते. यात 21 दशलक्ष टन लिथियम भांडार आहे.