जगाच्या अंतावेळीच खुलणारी तिजोरी
माणसांना जिवंत ठेवणारा खजिना
तिजोरी हा शब्द ऐकताच त्यात खुप सोने-चांदी आणि धन ठेवले असल्याचा विचार मनात येतो. प्रत्येकाच्या घरात छोटी किंवा मोठी तिजोरी असते. यात घरातील मूल्यवान सामग्री ठेवण्यात येते, परंतु एका तिजोरीत माणसांना जिवंत ठेवण्याचा खजिना लपविण्यात आला आहे. जगात डूम्सडे-वॉल्ट नावाची एक तिजोरी आहे. यात माणसांना जिवंत ठेवण्याचा खजिना आहे. या तिजोरीला जेव्हा खुले केले जाईल, तेव्हा जगात प्रलय आलेला असेल. या तिजोरीला नॉर्वेमध्ये अत्यंत कमी तापमानात ठेवण्यात आले आहे. या तिजोरीवर 100 देशांची दावेदारी आहे.
पृथ्वीवर प्रलय कधी येणार असा आता प्रश्न उपस्थित होतो. पृथ्वीवर अखेरचा प्रलय सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी आला होता, ज्यात पृथ्वीवरून डायनासोर समवेत अनेक अन्य जीवांच्या प्रजातींचे अस्तित्व संपुष्टात आले होते. तर पृथ्वीवर सहावा प्रलय लवकरच येणार असल्याचा दावा काही वैज्ञानिक करतात. पृथ्वीवर जेव्हा प्रलय येतो, तेव्हा यात माणसांसोबत फंगी, वृक्ष, बॅक्टेरिया, साप, पक्षी आणि माशांच्या प्रजाती विलुप्त होण्याचा धोका असतो. परंतु सहावा प्रलय हा हवामान बदल असेल असा दावा वैज्ञानिकांचा आहे.
तिजोरी खास का?
आर्क्टिक सागरानजीक नॉर्वेच्या स्पिट्सबर्गन आयलँडवर ठेवण्यात आलेल्या या डूम्सडे वॉल्टला ग्लोबल सीड वॉल्ट देखील म्हटले जाते. हे उत्तर ध्रूवानजीक असल्याने तेथील हवामान नेहमीच थंड असते. या तिजोरीला नॉर्वेच्या बेटावर एका पर्वताखाली सुमारे 400 फूट खोलवर तयार करण्यात आले आहे. या तिजोरीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम काँक्रिटच्या भुयारातून जावे लागते. यानंतर समोर एक अत्यंत मजबूत चेम्बर येते. तर याच चेम्बरमध्ये तीन तिजोऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक तिजोरीत कोट्यावधी बियाणे ठेवली जाऊ शकतात. यात 69 टक्के धान्य, 9 फळे अन् भाज्यांचे बीज आहेत. यात अनेक वनौषधींचे बीज देखील संरक्षित करण्यात आले आहे. तर वैद्यकीय शास्त्राकरता येथे अफूसारख्या अमली पदार्थांचे बीजही संरक्षित आहे.