For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Accident News | रस्त्यावरील 'खडी' ठरली जीवघेणी! दुचाकी घसरून शिरढोणच्या धनवे यांचा दुर्दैवी मृत्यू

03:18 PM Apr 21, 2026 IST | NEETA POTDAR
satara accident news   रस्त्यावरील  खडी  ठरली जीवघेणी  दुचाकी घसरून शिरढोणच्या धनवे यांचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

                          साताऱ्यात दुचाकी घसरून अपघात

Advertisement

सातारा : शिरढोण येथून साताराशहराकडे जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सयाजी मारूती धनवे (रा. शिरढोण, ता. कोरेगाव) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याची फिर्याद पुतण्या यश संभाजी धनवे (वय २२) यानेशहर पोलिसांत दिली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सयाजी धनवे १८ रोजी सायंकाळी ५.२० च्या सुमारास दुचाकीवरून शिरढोणहून साताऱ्याकडे येत होते. क्षेत्रमाहुली (ता. सातारा) येथील बसस्थानकाजवळ रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात ते गंभीरजखमी होऊन दुचाकीसह खाली पडले. त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयपत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना शनिवार १९ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.