For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रेसवर सरपटणारे रोबोटिक स्नेक

06:00 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
ड्रेसवर सरपटणारे रोबोटिक स्नेक
Advertisement

जगातील पहिला एआय ड्रेस

Advertisement

माणसाच्या खासगी आयुष्यापासून प्रोफेशनल आयुष्यापर्यंत एआयचा प्रवेश झाला आहे. आता हे तंत्रज्ञान फॅशन इंडस्ट्रीतही दाखल होत आहे. गुगलच्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरने रोबोटिक सापांनी युक्त एक ड्रेस तयार केला आहे. त्याने सोशल मीडियावर याच्या निर्मितीचा एक व्हिडिओ शेअर करत याला जगातील पहिला एआय ड्रेस ठरविले आहे.

क्रिस्टिना अर्न्स्ट यांनी हा व्हिडिओ शेअल करत ‘माझा रोबोटिक मेडुसा ड्रेस अखेर तयार झाला आहे’ असे नमूद केले आहे. शी बिल्ड्स रोबोट्स नावाच्या या पेजच्या बायोमध्ये याचा उद्देश युवतींना रोबोटचे संचालन शिकविणे असल्याचे नमूद आहे. रोबोटिक सापांचा ड्रेस आपण का तयार केला हे देखील क्रिस्टिना यांनी सागितले आहे.

Advertisement

क्रिस्टिना स्वत:च्या अयशस्वी प्रोटोटाइपची एक झलक देखील दाखवितात आणि सापाला चेहरे ओळखण्यासाठी कशाप्रकारे प्रोग्रामिंग केले हे देखील त्यांनी सांगितले आहे. रोबोटिक साप तयार करणे सोपे होते, परंतु त्यांना ड्रेसमध्ये फिट करणे अवघड काम होते असे त्या सांगतात.

रोबोटिक स्नेक

या एआय ड्रेसचे वैशिष्ट्या म्हणजे यावर असलेले रोबोट स्नेक लोकांना पाहून त्यांच्याप्रमाणे फिरतील. यामुळे साप तुमच्याकडेच रोखून पाहतोय असे वाटू लागते. ऑनलाइन येताच या व्हिडिओने एआयच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे लोकांना थक्क करून सोडले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 29 लाखाहून अधिक ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. लोक याच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करत आहे.

Advertisement
Tags :

.