For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकही गोळी न चालविता 316 कोटीची लूट

06:58 AM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
एकही गोळी न चालविता 316 कोटीची लूट
Advertisement

जर्मन बँकेतून रक्कम घेत गुन्हेगार पसार : ‘ओशन्स11’ चित्रपटाशी होतेय दरोड्याची तुलना

Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

जर्मनीत चोरांनी नाताळाच्या सुटीचा लाभ घेत एका बँकेतून कमीतकमी 30 दशलक्ष युरो (316 कोटी रुपये) मूल्याची रोकड आणि मूल्यवान सामग्री चोरली आहे. गुन्हेगारांनी गेल्सेनकिर्चेनमध्ये स्पार्कास बँकेच्या शाखेत मोठ्या काँक्रिटच्या भिंतीला ड्रील केले आणि मग हजारो सुरक्षित डिपॉझिट बॉक्समधून रक्कम चोरली आहे. जर्मनीत बहुतांश दुकाने आणि बँका नाताळापूर्वी 24 डिसेंबर रोजी संध्याकाळपासून बंद होता. पोलिसांना 29 डिसेंबर रोजी दरोड्याची माहिती कळली. तर मंगळवारी अनेक संतप्त ग्राहक बँकेसमोर एकत्र आले आणि त्यांनी नारेबाजी केली.

Advertisement

जर्मनीचे शहर गेल्सेंकिर्चेन येथे हा दरोडा पडला असून चोरांनी स्पार्कसे शाखेत 3 हजारांहून अधिक लॉकर्स तोडून रोख रक्कम आणि मूल्यवान सामग्री लांबविली आहे. संशयितांना नजीकच्या पार्किंग गॅरेजमधून ड्रिल करत भूमिगत लॉकर रुममध्ये प्रवेश केला. तसेच त्यांनी वीपेंडचा बहुतांश वेळ बँकेच घालविला, जेथे त्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक लॉकर्स तोडली असावीत असे पोलिसांनी सांगितले आहे.

सोमवारी पहाटे फायर अलार्म वाजू लागल्यावर दरोड्याची माहिती समोर आली. ज्यानंतर आपत्कालीन सेवांनी तपास सुरू केला असता लॉकर रुममध्ये जाणारे एक मोठे छिद्र दिसून आले. शनिवारी रात्रीपासूनच पार्किंग गॅरेजच्या जिन्यांमध्ये अनेक लोकांना मोठमोठ्या बॅग घेऊन जाताना पाहिले होते असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे.

सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सोमवारी पहाटे एक काळ्या रंगाची ऑडी आरएस6 गॅरेजमधून बाहेर पडताना दिसून आले, ज्यात चेहरे झाकून घेतलेले लोक होते. कारची नंबर प्लेट हनोवर शहरातून चोरण्यात आली होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या दरोड्याची तुलना हॉलिवूड चित्रपट ‘ओशन्स इलेवन’शी अधिकारी करत आहेत.

Advertisement
Tags :

.